परभणी/गंगाखेड (Kahar Reservation) : महाराष्ट्र राज्यातील कहार (Kahar Samaj), भोई, केवट, मल्लाह आदी तत्सम उपजातींना अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण (Kahar Reservation) द्यावे, अशा मागणीचे निवेदन दि. ४ जुलै गुरुवार रोजी ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने नायब तहसीलदार मो. अजीम यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टची मागणी
महाराष्ट्र राज्यातील कहार (Kahar Samaj), भोई, केवट, कश्यप, निषाद, मल्लाह, धीवर, धीमर, बाथम, गोडिया, मांझी आदी तत्सम उपजातींचा एन. टी ब मध्ये समावेश आहे. हे आरक्षण असून नसल्यासारखे असल्याने राजकीय, आर्थिक दृष्ट्या मागास आणि वंचित असलेल्या वरील जातीतील समाज बांधवांचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्तर उंचावून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या उपजातींचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून, मागणीचा विचार नाही झाल्यास आंदोलन छेडून आरक्षण (Kahar Reservation) मिळत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर ग्लोबल कहार समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या सौ. संगिता कचरे, तालुकाध्यक्ष सौ. पमाबाई गहिरे, सोपान कचरे, भरत कचरे, सौ. जनाबाई भुंगासे, देवमन कचरे, सौ. मुक्ताबाई बिजले, सौ. लक्ष्मीबाई कचरे, सौ.अनुसया कचरे, उर्मिला कचरे, शोभा कचरे, यशोदा गहिरे, एल.के. कचरे, छत्रपती गहिरे, राधा कचरे, नवनाथ गहिरे, दिनानाथ घिसडे, उमा कचरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.