परभणी/गंगाखेड(Parbhani):- बदलापूर येथे दोन विद्यार्थीनींवर झालेल्या अत्याचाराच्या (torture) घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व मित्रपक्षांच्या वतीने दि. २४ ऑगस्ट शनिवार रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये गंगाखेड तालुक्यातील व्यापारी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन गंगाखेड महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
या संदर्भात महाविकास आघाडीतील कॉंग्रेस (Congress)पक्षाचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (Sharad Chandra Pawar) तालुकाध्यक्ष उद्धवराव सातपुते, शिवसेना (Uddhav Thackeray) गटाचे उपजिल्हाप्रमुख ॲड. मनोज काकाणी, शहर प्रमुख जीतेश गोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष नारायण घनवटे, माजी नगरसेवक शेख मुस्तफा मामा आदी पदाधिकाऱ्यांनी दि. २३ ऑगस्ट शुक्रवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांची भेट घेवून निवेदन सादर केले. शनिवार रोजी सकाळी १० वाजता शहरातील भगवती चौक येथून मुक मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. सर्व व्यापारी बांधवांनी आपले व्यवहार बंद ठेवून या महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन ही या निवेदनात करण्यात आले आहे.