परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : घरासमोर कचरा टाकण्यावरून झालेल्या वादात दोन गटात (Gangakhed crime) हाणामारी झाली. ही घटना सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी येथे घडली. सदर प्रकरणी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीवरून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. केवडाबाई चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी तुम्ही घरासमोरचा उकंडा काढून टाका, आमच्या घराकडे पाणी येत आहे, असे म्हणत शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. या प्रकरणी संतराम गयाळ, सुनिल गयाळ, बाबुराव गयाळ, योगेश गयाळ, नागेश गयाळ, प्रभाकर गयाळ, सुरेश गयाळ, बबन गयाळ यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
तर दुसरी तक्रार सुनिल गयाळ यांनी दिली आहे. तुम्ही येथे कचरा व घाण टाकू नका त्याचा आम्हाला त्रास होत आहे. आमच्या घरातील मुले आजारी पडत आहेत. असे म्हणाल्यानंतर आरोपींनी संगनमत करत, (Gangakhed crime) शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी केवडाबाई चव्हाण, ज्ञानेश्वरी चव्हाण, विठ्ठल चव्हाण, माधव चव्हाण, शेषराव चव्हाण, विठ्ठल राठोड, विष्णू चव्हाण, बाबुराव चव्हाण यांच्यावर २४ मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.