परभणीच्या गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांचे आवाहन
परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : ग्रामीण भागात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल तात्काळ व्हावी व मालमत्ते संबंधीच्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून खोट्या तक्रारीवर आळा बसावा तसेच गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याकरिता ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी गाव पातळीवर (CCTV camera) सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आवाहन (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दि. ५ जुलै शुक्रवार रोजी संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत बैठकीत बोलताना केले.
ग्रामीण भागात वाढत जाणाऱ्या मालमतेविरुध्दच्या गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध करून गावात घडणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याकरीता मदत व्हावी व खोटया तक्रारीवर आळा बसावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या संकल्पनेतून गंगाखेड उपविभागा अंतर्गत येणाऱ्या गंगाखेड, पिपंळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावागावात (CCTV camera) सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्या संदर्भाने दि. ५ जुलै शुक्रवार रोजी गंगाखेड शहरातील संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्यासह पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अक्षय सूक्रे, पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सपोनि दिनेश सुर्यवंशी, सपोनि शिवाजी शिंगणवाड, पोउपनि संदीप गडदे, पोउपनि विशाल बुधोडकर, पोउपनि मुन्ना देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पोलीस प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाकडुन ग्रामीण भागातील सर्व गावांना प्राधान्याने (CCTV camera) सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्या बाबतचे महत्व व आधुनिक काळानुसार सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या असलेल्या गरजेचे महत्त्व पटवुन देत गावागावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप देवराव टिपरसे यांच्याकडून करण्यात आले. पोलीस प्रशासनाने केलेल्या अवहांनानुसार आठ गावांत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे व १५ ऑगस्टपर्यंत बहुतांश गावात सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जातील अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली.
याप्रसंगी गंगाखेड (Gangakhed Police) व पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पोनि दिपककुमार वाघमारे यांनी आभार प्रदर्शन पोउपनि व्यंकट गंगलवाड यांनी केले तर यशस्वीतेसाठी पोलीस जमादार उमाकांत जामकर, महीला पोलीस जमादार विमल पवार, पोलीस अंमलदार दत्तराव चव्हाण, संजय साळवे आदींनी परिश्रम घेतले.