परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : सरपंचांनी पकडून दिलेली (Sand Mafia) वाळूची वाहने वाळू माफियांनी पोलीसांच्या तावडीतून पळवून नेल्याची घटना दिनांक २७ मे सोमवार रोजीच्या रात्री गंगाखेड शहरात घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police) चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या उपसा करून होणारी वाळू चोरी केंव्हा थांबणार?, असा प्रश्न तालुका वासीयांतून उपस्थित केला जात आहे.
चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
गंगाखेड तालुक्यातून (Gangakhed crime) वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्रातील खुली झालेली वाळू विनापरवाना चोरून नेण्यासाठी (Sand Mafia) वाळू माफियांत मोठी स्पर्धा लागली असून मिळेल त्या जागेवरून वेळ भेटेल तेंव्हा वाळू उपसा करून रात्री अपरात्री विनापरवाना अवैधरित्या वाळूची वाहतूक केल्या जात आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या वाळूच्या अवजड वाहनांचा त्रास होत असल्यामुळे वाळूची वाहने थांबविण्यासाठी गोदावरी नदी काठच्या गावातील ग्रामस्थ सरसावल्याचे चित्र गोदाकाठच्या गावा गावात दिसत आहे. दिनांक २७ मे सोमवार रोजी तालुक्यातील मैराळसावंगी परिसरातून अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याचे समजल्यावरून खळी येथील रस्त्यावर आम्ही वाळूची वाहने थांबविणार असल्याचे व महसूल विभागाचे अधिकारी ही येथे येणार असल्याची माहिती सरपंच शिवाजी पवार यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात देत पोलीस कर्मचारी पाठवावे असे सांगितले.
वाळू चोरी केंव्हा थांबणार?
सरपंच शिवाजी पवार यांच्यासह खळी गावातील काही ग्रामस्थांनी रस्त्यावर चार चाकी वाहन आडवे लावून रात्री अंदाजे ९ वाजेच्या सुमारास खळी गावालगतच्या रस्त्यावर मैराळसावंगीकडून वाळू घेवून येणारी दोन वाहने थांबविली. याच दरम्यान तेथे पोलीस वाहन घेऊन आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन्ही वाहने गंगाखेड पोलीस ठाण्याच्या दिशेने घेण्यास सांगितले तेंव्हा गंगाखेड शहरातील परळी नाका परिसरात ही दोन्ही वाहने येताच (Sand Mafia) वाळू माफियांनी पोलीसांची नजर चुकवीत वाळूने भरलेली वाहने पळवून नेली. हा प्रकार पोलीस कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर याप्रकरणी पोलीस शिपाई शंकर गयाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशिराने हनुमंत लटपटे, जडे आप्पा व दोन्ही वाहनाचे चालक अशा चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास (Gangakhed Police( सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे हे करीत आहे.
पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
गंगाखेड तालुक्यातील खळी (Gangakhed crime) येथील सरपंच व ग्रामस्थ रात्रीच्या वेळी भरधाव वेगात अवैधरित्या वाळू वाहतूक करणारी वाहने थांबविणार असल्याची माहिती सरपंचांनी पोलीस प्रशासनाला दिली असतानासुद्धा घटनास्थळी (Gangakhed Police) पोलीस अधिकारी तसेच काही पोलीस कर्मचारी पाठविणे गरजेचे असताना पोलीस वाहनासोबत चालक आणि केवळ एक पोलीस शिपाई पाठविण्यात आल्याने सरपंचांनी पकडून दिलेली वाळूची दोन्ही वाहने वाळू माफियांनी पोलीस ठाण्यात येण्यापूर्वीच पळवून नेल्याची घटना घडल्याने पोलीस अधिकारी न पाठविता पोलीस कर्मचारी पाठविल्याने खळी येथील (Gangakhed Police) ग्रामस्थांतून पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. तर शासनाचा महसूल बुडवून रात्री अपरात्रीच्या वेळी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू वाहतूक होत असताना ही महसूल प्रशासनाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष का करीत आहे असा सवाल ही तालुका वासीयांतून उपस्थित केला जात आहे.