परभणी/गंगाखेड (Gangakhed crime) : राष्ट्रीयकृत बँकेत पैसे भरण्याच्या रांगेत उभ्या असलेल्या वृध्द शेतकऱ्याजवळील पिशवीतील एक लाख छेचाळीस हजार रुपये (१४६००० रूपये) चोरट्यांनी पळविल्याची घटना दि. ६ जुलै शनिवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास (Gangakhed crime) गंगाखेड शहरात घडली आहे. ही घटना बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.
गंगाखेड शहरातील राष्ट्रीयकृत बँकेतील घटना
माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील कौडगाव येथील शेतकरी तुराबखां गफुरखां पठाण वय ७० वर्ष यांनी त्यांच्या जवळील कापुस पालम रस्त्यावरील जिनींगमध्ये व इसाद रस्त्यावरील एका व्यापाऱ्याकडे विक्री केला. हा कापुस विक्री केल्यानंतर जिनींगमधून घेतलेले १ लाख ६१ हजार रुपये व २७ हजार रुपये असे एकूण १ लाख ८८ हजार रुपये व दि. ६ जुलै शनिवार रोजी इसाद रस्त्यावरील व्यापाऱ्याकडून घेतलेले १ लाख ४६ हजार असे एकुण अंदाजे ३ लाख ३४ हजार रुपये घेऊन तुराबखां गफुरखां पठाण हे नारायण बापूराव सातपुते रा. इसाद यांच्यासोबत गंगाखेड शहरातील शनिवार बाजार परिसरात असलेल्या राष्ट्रीयकृत बँकेत आले.
पैसे भरण्यासाठीच्या काऊंटरवर कॅशिअर नसल्याने ते बँकेतील रांगेत पहिल्या क्रमांकावर उभे आसतांना त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या दोन संशयीत तरूणांपैकी एकाने तुराबखां गफुरखां पठाण यांच्या हातातील पिशवी फाडून त्यातील (१४६०००) एक लाख छेचाळीस हजार रुपये घेऊन पसार झाले. पिशवीतील तीन लाख चौतीस हजार रुपयांपैकी काही रुपयांची चोरी करून चोरटे पसार झाल्याची बाब काही क्षणातच तुराबखां गफुरखां पठाण यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडा ओरडा केला.
तेंव्हा बँकेतील कर्मचाऱ्यांनी बँकेचे गेट बंद करून बँकेत असलेल्या ग्राहकांकडे चौकशी करत घटनेची माहिती (Gangakhed Police) पोलीसांना दिली असता पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक युसुफ खान पठाण, पोलीस शिपाई अनंत डोंगरे, परसराम परचेवाड, चालक सुग्रीव सावंत आदींनी बँकेत धाव घेऊन तेथील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दोन चोरट्यांचे व्हिडिओ हस्तगत करत त्यांचा शोध घेतला.
मात्र या चोरट्यांचा शोध लागला नसल्याने बँकेतील सीसीटिव्ही फुटेज स्थानिक गुन्हे शाखा व परिसरातील पोलीस ठाणे प्रमुखांना पाठविल्याने (Gangakhed crime) स्थानिक गुन्हे शाखा परभणी येथील सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, परसराम गायकवाड, राहुल परसोडे, दिलीप निलपत्रेवार आदींनी गंगाखेड येथे भेट देऊन चोरट्यांचा शोध घेतला. मात्र त्यांच्याही हाती निराशाच आली. भरदुपारी बँकेतील रांगेतून चोरटयांनी एक लाख छेचाळीस रुपये पळविल्याची घटना घडल्याने नागरिकांत चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी (Gangakhed crime) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.