परभणी/गंगाखेड (Gangakhed crime) : परभणी रस्त्यावर गंगाखेड तालुक्यातील खळी पाटीजवळील पुलाखाली गोदावरी नदी पात्रात दि. ७ जुलै रविवार रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह (Gangakhed crime) आढळून आला आहे. यात घातपाताचा संशय आल्याने (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
घातपाताचा संशय, इन कॅमेरा शवविच्छेदन
तालुक्यातील खळी पाटीजवळ (Gangakhed Hospital)गंगाखेड परभणी रस्त्यावर असलेल्या गोदावरी नदी पुलाखाली नदी पात्रातील पाण्यात मृतदेह (Gangakhed crime) तरंगत असल्याची माहिती दि. ७ जुलै रविवार रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास खळी येथील पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे यांना मिळाल्याने त्यांनी ही माहिती गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. गोदावरी नदी पात्रात मृतदेह तरंगत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी शिंगणवाड, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, जमादार सुंदरराव शहाणे, पोलीस शिपाई प्रकाश गिराम, शिवाजी बोमशेटे, खळी पोलीस पाटील पुंडलिक सुरवसे, दुस्सलगाव येथील पोलीस पाटील संगीता कचरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
मृतदेह नदीपात्रात खोल पाण्यात असल्याने पोलीस पाटील संगीता कचरे यांनी दुस्सलगाव येथील भोई त्रिंबक नामदेव कचरे यांना बोलावून घेत थर्माकोल व्होडीच्या सहाय्याने मृतदेह काठावर आणला. गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे विलास खंडेलवाल, शाम जगतकर, गुड्डू शेख, विनोद सावंत, आकाश लव्हाळे, अभिषेक साळवे, सूरज खंडेलवाल यांच्या मदतीने हा मृतदेह पाण्याबाहेर काढला. अंदाजे २५ ते ३० वर्ष वयोगटातील असलेल्या या मृतदेहाच्या पोटाला दगड बांधलेला व त्याचे दोन्ही पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत असल्याने शविच्छेदनासाठी हा मृतदेह रावण भालेराव यांच्या रुग्णवाहिकेतून (Gangakhed Hospital) गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
मृतदेहाची परिस्थिती पाहून संशय वाढल्याने व हा घातपाताचा प्रकार असू शकतो. या (Gangakhed crime) संशयामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन पाहणी केली त्यांच्या व अन्य (Gangakhed Police) पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा इनकॅमेरा शवविच्छेदन करण्याची तसेच पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.