गंगाखेड (Gangakhed Police) : रस्त्याच्या मधोमध धोकादायक स्थितीत ऑटो वाहन (Auto drivers) लाऊन रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या चौदा ऑटो चालकांविरुद्ध गंगाखेड पोलीसांनी कार्यवाही करत गुन्हे दाखल केले आहे. यामुळे ग्रामीण भागात तसेच शहरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. (Gangakhed Police) पोलीस प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीमुळे शहरातील रस्ते मात्र मोकळे झाल्याचे दिसत आहे.
गंगाखेड पोलीसांची मोठी कारवाई
परभणी/गंगाखेड शहरासह ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारे ऑटो चालक व अन्य वाहन धारक रस्त्यावर कोठे ही थांबून प्रवासी भरत असल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन शहरातील पोलीस स्टेशन समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अहिल्याबाई होळकर चौक, डॉक्टर लाईन, बस स्थानक परिसरासह अन्य मुख्य रस्त्यावरील वाहतूक व्यवस्थेचा वारंवार खोळंबा उडत असल्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली (Gangakhed Police) गंगाखेड पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे, पोलीस शिपाई प्रशांत वावळे, शंकर गयाळ आदींनी दिनांक १७ मे शनिवार ते दिनांक २० मे सोमवार दरम्यान मोहीम राबवून चौदा ऑटो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तीन ऑटो चालकांविरुद्ध गुन्हा दाखल
दिनांक १७ मे शनिवार रोजी तीन ऑटो चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर दिनांक १९ मे रविवार रोजी (Gangakhed Police) पोलीस ठाण्यासमोरील मिलन हॉटेलसमोर गजेंद्र मरीबा बनसोडे रा. दाऊदपुर तालुका परळी याने त्याच्या ताब्यातील ऑटो क्रमांक एमएच २३ एच ७०३३ हा सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होऊन लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल. अशा प्रकारे रस्त्याच्या मधोमध उभा केल्याने पोलीस शिपाई शंकर गयाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.
दिनांक २० मे सोमवार रोजी शहरातील तहसिल कार्यालयासमोर, डॉक्टर लाईन, अहिल्याबाई होळकर चौक, डॉ. आंबेडकर चौक आदी ठिकाणी रस्त्याच्या मधोमध आपल्या ताब्यातील ऑटो उभे करून रहदारीस अडथळा निर्माण केल्यावरून ऑटो क्रमांक एमएच ४४ सी ५३६२ चा चालक अविनाश खुशाल जायभाये रा. अंतरवेली तालुका गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच २२ यु ५६२९ चा चालक गोविंद आत्माराम शिंदे रा. खादगाव तालुका गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच २२ यु ५१७६ चा चालक सय्यद अलावद्दिन सय्यद उस्मान रा. ममता कॉलनी गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच २२ यु २७६४ चा चालक पवन प्रकाश भिसे रा. पिंप्री (झोला) तालुका (Gangakhed Police) गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच २३ एडी १४८४ चा चालक शिवा दगडू कौसे रा. रॉकेल कॉलनी गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच २२ यु ४८१० चा चालक दत्ता प्रभू देवकते रा. मरगळवाडी तालुका गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच ४४ – ४६११ चा चालक आकाश शिवाजी जाधव रा. निळा तालुका सोनपेठ, ऑटो क्रमांक एमएच २२ एपी १७८४ चा चालक सुधीर चंद्रकांत पैठणकर रा. व्यंकटेश नगर गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच २२ एपी ०७२१ चा चालक अशोक केशव होळंबे, रा. सांगळेवाडी तालुका गंगाखेड, ऑटो क्रमांक एमएच २२ एपी ०२११ चा चालक दयानंद ज्ञानोबा सावंत रा. झोला तालुका गंगाखेड अशा एकूण चौदा जणांविरुद्ध पोलीस शिपाई प्रशांत वावाळे, शंकर गयाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ आदोडे हे करीत आहेत.