शहरातील ऑटो चालकांना पोलिसांकडून कडक सुचना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : शहरातील मुख्य बाजार पेठेत नित्याची झालेली वाहतुक कोंडी समस्या कायमची सोडविण्यासाठी दि. १६ सप्टेंबर सोमवार रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या ऑटो चालकांच्या बैठकीत (Gangakhed Police) पोलीस प्रशासनाकडून कडक सूचना देण्यात आल्या आहेत. तर वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणारे रस्त्यावर असलेले दुकानाचे ओटे, नाम फलक काढण्याची मागणी ही ऑटो चालक व शहर वासियांतून केली जात आहे.
गंगाखेड शहरातील (Gangakhed Police) मुख्य बाजार पेठेतील मुख्य रस्त्यावर तसेच दिलकश चौक, बस स्टँड रोड, राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, भगवती चौक आदी भागात बेशिस्तपणे थांबणाऱ्या दुचाकी, चार चाकी वाहने, ऑटो व फळांच्या हातगाड्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक, दिलकश चौक परिसरात व मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी प्रचंड प्रमाणात वाढल्याने व नुकत्याच संपन्न झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या समोर आल्याने त्यांनी दिलेल्या सूचनांनुसार (Gangakhed Police) पोलीस प्रशासनाने राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकातील रस्त्याच्या मधोमध असलेला ऑटो स्टँड होळकर चौक परिसरातील नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत हलवून येथे लागणाऱ्या फळांच्या हात गाड्यांना ही एका बाजूला करत रहदारीसाठी हा चौक पूर्णपणे मोकळा करत रस्त्यावर ऑटो, दुचाकी व चार चाकी वाहने उभे करणाऱ्या विरुद्ध गेल्या आठवड्यापासून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे.
त्याचप्रमाणे शहरातील सर्व ऑटो चालकांची सोमवार रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयंवंत सोनवणे व पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या उपस्थितीत गंगाखेड पोलीस ठाण्यात बैठक घेवून यापुढे होळकर चौकात किंवा मुख्य रस्त्यावर रस्त्याच्या मधोमध बेशिस्तपणे ऑटो लावायचा नाही. नगर परिषदेच्या मोकळ्या जागेत ऑटो थांबवुन तेथे प्रवासी उतरवावे किंवा बसवावे, सर्व ऑटो चालक, मालकांनी आपापल्या ऑटोची कागदपत्रे सोबत ठेवण्याच्या सूचना करून ऑटो चालकाने चालकाचा गणवेश घालूनच ऑटो चालवावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देत पोलीसांनी दिलेल्या सुचनेनुसार वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन (Gangakhed Police) पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांनी केले. जो कोणी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणार नाहीत त्यास कठोर अशा दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागणार असे सांगत उपस्थित सर्व ऑटो चालकांना कडक सुचना दिल्या आहे. तर ऑटो पॉइंटसाठी दिलेल्या मोकळ्या जागेची पाहणी करून या परिसरातील स्वच्छता तात्काळ करण्याच्या सूचना मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांनी स्वच्छता विभागातील वसंत वाडकर, जालिंदर गायकवाड यांना दिल्या आहे. या बैठकीस ऑटो चालक, मालकासह वाहतूक शाखेचे सपोउपनि वैजनाथ आदोडे उपस्थित होते.
रस्त्यावर असलेले दुकानाचे ओटे, साहित्य, नाम फलक नगर परिषद प्रशासनाने काढावे. (Gangakhed Police) गंगाखेड शहरातील मुख्य बाजार पेठेत नेहमीच होत असलेल्या वाहतूक कोंडीस केवळ फळ विक्रेते हातगाडे चालक किंवा ऑटो चालक कारणीभूत नसून रस्त्याच्या मध्यापर्यंत आलेले दुकानदारांचे ओटे, साहित्य, नाम फलक ही तेवढेच कारणीभूत असल्याने दुकानदारांनी दुकानाबाहेर बांधलेले ओटे, रस्त्यावर ठेवलेले साहित्य, दुकानाचे नाम फलक ही नगर परिषद प्रशासनाने काढून घ्यावे अशी मागणी ऑटो चालकांसह शहरातील नागरिकांतून केली जात आहे.