परभणी/गंगाखेड (Gangakhed rally) : कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड येथील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली (Gajapur attack case) गजापुर येथील मस्जिद व मुस्लिम वस्तीवरील हल्ला प्रकरणी दि. १९ जुलै शुक्रवार रोजी शहरातील मुख्य रस्त्याने शांततामय निवेदन निषेध रॅली काढून तहसील प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली जमलेल्या जमावाने विशालगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्याऐवजी या किल्ल्यापासून दूर अंतरावर असलेल्या गजापूर येथील (Gajapur attack case) मुस्लिम वस्तीवर हल्ला करून घरांची तसेच वाहनांची तोडफोड करत मस्जिदमध्ये घुसून तेथील साहित्यांची नासधूस करत जाळपोळ केली. ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेच्या निषेधार्थ दि. १९ जुलै शुक्रवार रोजी दुपारी ३ वाजता गंगाखेड शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने शांततामय निवेदन नावाने जैंदिपुरा येथून शहरातील मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध रॅली काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नायब तहसीलदार सुनील कांबळे यांच्याकडे निषेधाचे निवेदन सादर केले.
यावेळी शहरातील मौलवी, सामाजिक व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पुढारी, कार्यकर्ते, तरुण मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक युसुफ पठाण, जमादार उमाकांत जामकर, प्रकाश रेवले, संजय साळवे, शंकरराव रेंगे, सुंदरराव शहाणे, नामदेव आदमे, वैजनाथ अदोडे, प्रशांत व्हावळे, शंकर गयाळ आदी (Gangakhed Police) पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.