परभणी/गंगाखेड (Gangakhed School) : शाळेत प्रवेश करण्यासाठी लावलेला लोखंडी प्रवेशद्वार (Gangakhed School) अचानक कोसळल्याची घटना दि. १६ जुलै मंगळवार रोजी दुपारी अंदाजे १२:४५ वाजेच्या सुमारास घडली. याच दरम्यान परीक्षा सुरू असल्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणी ही जखमी झाले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील भगवती चौक परिसरात मध्यवस्तीत असलेल्या व्यंकटेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १६ जुलै मंगळवार रोजी सकाळी ११ ते २ वाजे दरम्यान इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर सुरू असतांना याचवेळी (Gangakhed School) एक महिला शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी शाळेत आली व सदर महिलेने बंद असलेले लोखंडी प्रवेशद्वार उघडून शाळेत प्रवेश करताच प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचे एक फाटक अचानक तुटून धाडकन कोसळले प्रवेशद्वार कोसळत असल्याचे समजताच महिला तात्काळ बाजूला झाल्याने या घटनेत सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
अचानक धाडकन कोसळलेल्या (Gangakhed School) शाळेच्या लोखंडी प्रवेशद्वाराचा आवाज ऐकून शाळेबाहेर थांबलेल्या पालकांनी एकच गर्दी केली व या घटनेत कोणास काही झाले नसल्याचे पाहून पालकांसह शाळेतील शिक्षकांनी सुटकेचा श्वास सोडला. शाळेचा लोखंडी प्रवेशद्वार कोसळताना तिथे असलेल्या महिलेचे दैव बलवत्तर असल्याने कोणती विपरीत घटना घडली नसली तरी अत्यंत गंजलेल्या अवस्थेत असलेला शाळेचा लोखंडी प्रवेशद्वार संस्था चालकांनी तात्काळ बदलावा, अशी मागणी यावेळी उपस्थित पालक वर्गातून केली जात होती.