गंगाखेड शहरातील घटना, युवतीसह महिलेचा समावेश
परभणी/गंगाखेड (Gangakhed Suicide Case) : शहरातील प्राध्यापक कॉलनी व जायकवाडी वसाहत अशा दोन वेगवेगळ्या भागात राहत्या घरी पंख्याला गळफास (Suicide Case) घेऊन एकाच दिवशी एक तरुणी व एका महिला अशा दोघांनी आत्महत्या केल्याची घटना दि. १९ ऑगस्ट सोमवार रोजी घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील प्राध्यापक कॉलनी येथील वनमाला बालाजी नागरगोजे वय ५२ वर्ष यांनी वारंवार डोकं दुखत असल्याच्या त्रासाला कंटाळून दि. १९ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजे दरम्यान राहत्या घरी दोरीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide Case) केली. याची माहिती उमेश बालाजी नागरगोजे वय २३ वर्ष यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली तर दुसऱ्या घटनेत अश्विनी नामदेव नागरगोजे वय १९ वर्ष रा. टोकवाडी ता. गंगाखेड ह. मु. जायकवाडी वसाहत गंगाखेड या युवतीने दुपारी ३:३० ते सायंकाळी ५:३० वाजे दरम्यान घरी कोणी नसतांना कोणत्या तरी अज्ञात तणावाखाली घराचा दरवाजा आतून लावून घेत ओढणीने छताच्या पंख्याला गळफास घेऊन (Suicide Case) आत्महत्या केली. याप्रकरणी नामदेव प्रल्हाद नागरगोजे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या दोन्ही घटनेचा तपास अनुक्रमे जमादार सुंदरराव शहाणे, सहायक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर हे करीत आहेत.