परभणीतील गंगाखेडच्या गोपा येथील घटना
परभणी/गंगाखेड (Gangakhed Suicide Case) : शेतातील लिंबाच्या झाडाला कासऱ्याच्या दोरीने गळफास घेऊन ३५ वर्षीय इसमाने (Suicide Case) आत्महत्या केल्याची घटना दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी तालुक्यातील गोपा शिवारात घडली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर गेलेल्या गंगाखेड तालुक्यातील गोपा येथील विनायक रामराव गावंडे वय ३५ वर्ष याने अज्ञात कारणावरून दारूच्या नशेत गोपा शिवारातील त्याच्या मालकीच्या शेतात लिंबाच्या झाडाला बैलाच्या कासऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वजेच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक व्यंकट गंगलवाड, जमादार संभाजी शिंदे, पो. शि. अनंत डोंगरे, धनंजय कणके, शिवाजी बोमशेटे आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. याप्रकरणी महादेव भिमराव गावंडे वय ३६ वर्ष रा. गोपा यांनी दिलेल्या खबरीवरून (Gangakhed Suicide Case) गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास जमादार गणेश चनखोरे हे करीत आहेत.