परभणी/गंगाखेड (Gangakhed Suicide) : तालुक्यातील राणीसावरगाव येथील ३५ वर्षीय इसमाने दुकानातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी (Gangakhed Police) पिंपळदरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राणीसावरगाव येथील घटना
माहितीनुसार, गंगाखेड तालुक्यातील (Gangakhed taluka) राणीसावरगाव येथील सदानंद सुदाम सुरुळे वय ३५ वर्ष याची पत्नी नांदत नसल्यामुळे तो सतत दारूच्या राहत असे. रात्री सदानंद सुरुळे हा घरून जेवण करून गेला तो नंतर घरी परत आला नाही. आज रविवार रोजी सकाळी त्याचे वडील सुदाम सदाशिव सूरुळे यांनी दुकान उघडले असता दुकानातील लाकडी आळूला रुमालाने गळफास घेवून त्याने आत्महत्या (suicide Case) केल्याचे दिसून आले.
या (Gangakhed Suicide) घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दिनेश सुर्यवंशी, (Gangakhed Police) सहायक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ शिनगारे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी करत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदानासाठी राणीसावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. याप्रकरणी मयत सदानंद सुरुळे यांचे वडील सुदाम सदाशिव सुरुळे यांनी दिलेल्या खबरीवरून पिंपळदरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास (Gangakhed Police) सहायक पोलीस उपनिरीक्षक वैजनाथ शिनगारे हे करीत आहेत.


