विज कोसळून चार जनावरे सहा शेळ्या दगावल्या
परभणी/गंगाखेड (Gangakhed taluka lightning) : तालुक्यात शनिवार रोजी दुपारी सर्वदूर पर्यंत झालेल्या जोरदार पावसात गुंडेवाडी, घटांग्रा, तांदुळवाडी येथे विज कोसळून दोन बैल, दोन म्हैस व सहा शेळ्या दगावल्या असून एक महिला जखमी झाली आहे. तर शहरापासून जवळच असलेल्या मन्नाथ तलाव परिसरात मासेमारी करणाऱ्या कुटुंबाच्या झोपडीवर (Gangakhed taluka lightning) वीज कोसळून संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
गंगाखेड तालुका परिसरात शनिवार रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास सर्वदूर पर्यंत काळे कुट आभाळ पसरून (Gangakhed taluka lightning) विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यादरम्यान राणीसावरगाव मंडळा अंतर्गत असलेल्या मौजे ईळेगाव, गुंडेवाडी शिवारात रस्त्याने घराकडे म्हैस घेवून जाणाऱ्या जयश्री विठ्ठल बैकरे यांच्या शेजारी अचानक विज कोसळल्याने विठ्ठल बाबुराव बैकरे यांची म्हैस जागीच दगावली तर जयश्री विठ्ठल बैकरे या जखमी झाल्या आहे.
घटनेची माहिती समजताच ईळेगाव, गुंडेवाडी येथील मारोतराव काळे, गिरजाप्पा बैकरे, प्रा. सुदाम बैकरे, बापूराव धरणे, कैलास पाटील, बाळू गुडदे, हनुमंत गुडदे, दत्तराव जाधव, गणपती चोपडे आदींनी जखमी महिलेला उपचारासाठी गंगाखेड येथील खाजगी रुग्णालयात हलविले आहे. याच दरम्यान मौजे घटांग्रा शिवारात झाडावर (taluka lightning) विज कोसळल्याने झाडाखाली थांबलेल्या संजय राठोड यांच्या ६ शेळ्या मरण पावल्या आहेत. तांदुळवाडी शिवारात सोपान अंगद कातकडे रा. कातकरवाडी यांच्या शेतात विज कोसळल्याने तेथे बांधलेली एक म्हैस आणि दोन बैल जागीच दगावले आहे.
गंगाखेड शहरापासून जवळच असलेल्या मन्नाथ तलाव परिसरात मासेमारी करणाऱ्या वेणूबाई वरागिरी कचरे यांच्या झोपडीवर वीज कोसळल्याने झोपडीत ठेवलेले कपडे आणि संसारोपयोगी साहित्य जळाले आहे. मोठ्या प्रमाणात (Gangakhed taluka lightning) विजा कडाडत असल्याने पूजा कचरे यांनी लहान मुलांना घेऊन बाजूच्या झोपडीत आसरा घेतल्याने येथे कोणतीही जिवीत हानी झाली नाही. उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी तालुक्यात ठिकठिकाणी वीज कोसळून झालेल्या नुकसानीचा आढावा घेत तलाठी व मंडळ अधिकारी यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.