परभणी/गंगाखेड (Gangakhed Tehsil Office) : झोपडपट्टी धराकांचे (slum dwellers) अतिक्रमण नियमानुकुल करून त्यांना (PTR Allotment) पिटीआर देण्याच्या मागणीसाठी गंगाखेड तहसील (Gangakhed Tehsil Office) कार्यालयासमोर २१ दिवस उपोषण करणाऱ्या उपोषणार्थींची दखल घेत मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या लेखी व तोंडी आश्वासनानुसार दिनांक ६ जूननंतर या झोपडपट्टी धारकांना पीटीआर वाटप करावे, अशी मागणी (Jan Shakti Samiti) जनशक्ती कृती समितीचे प्रमोद मस्के यांनी दिनांक १३ मे सोमवार रोजी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जनशक्ती कृती समितीची मागणी
गंगाखेड शहरातील गौतम नगरातील सर्वे नंबर २५४ शासकीय गायरानवरील व सर्वे नंबर २५५, २५८ मधील जायकवाडीच्या शासकीय जमिनीवर गेल्या २० ते ३० वर्षापासून झोपडपट्टी करून राहत असलेल्या झोपडपट्टी धारकांचे अतिक्रमण नियमानुकुल करण्याची मागणी करत दिनांक २६ फेब्रुवारी रोजीपासून येथील झोपडपट्टी धारकांनी (Gangakhed Tehsil Office) गंगाखेड तहसील कार्यालयासमोर सलग २१ दिवस आमरण उपोषण केले होते. या उपोषणाची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वे नंबर २५४ मधील शासकीय गायरान व सर्वे नंबर २५५, २५८ मधील जायकवाडीच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहणाऱ्या नागरिकांना दिनांक ६ जून रोजीनंतर (PTR Allotment) पिटीआर देण्याचे तोंडी व लेखी आश्वासन दिनांक ११ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत दिले होते.
या आश्वासनाप्रमाणे दिनांक ६ जूननंतर गौतम नगरातील नागरिकांना (PTR Allotment) पि.टी.आर. वाटप करावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा (Jan Shakti Samiti) जनशक्ती कृती समिती व झोपडपट्टी धारकांच्या वतीने दिनांक १३ मे सोमवार रोजी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी जनशक्ती कृती समितीचे प्रमोद मस्के, राजाभाऊ जाधव, सिताराम गायकवाड, सुभाष भालेराव, शेख पाशाभाई, अशोक कांबळे, उत्तम साळवे, शेख रहीमोदिन, उत्तम सूर्यवंशी, महादेव पंडित, शेख पाशा, लक्ष्मण एंगडे, शेख पाशा रहीम, खदीर कुरेशी, शेख रहीमोद्दिन आदी उपस्थित होते.