परभणी/गंगाखेड (Gangakhed Youth Death) : घराच्या छतावरून झोपेत खाली उतरतांना पडल्याने वीस वर्षीय युवकाचा मृत्यू (Gangakhed Youth Death) झाल्याची घटना सोमवार रोजीच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास गंगाखेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरात घडली. याप्रकरणी (Gangakhed Police) पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की गंगाखेड शहरातील महात्मा फुले नगर परिसरातील रहिवासी सखुबाई संपत कांबळे वय ४० वर्ष या मुलगा धुराजी कांबळे वय २० वर्ष व सूने सोबत सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घराच्या छतावर झोपी गेले होते. मध्यरात्री दि. १ ऑक्टोबर मंगळवार रोजीच्या अंदाजे १ वाजेच्या सुमारास कशाचा तरी खडखड आवाज आल्याने झोपेतून जागे झालेल्या सखुबाई कांबळे यांनी पाहिले असता मुलगा धुराजी संपत कांबळे हा घराचे पायऱ्याच्या जिन्याखाली पडलेला दिसल्याने त्यांनी सुनेला सोबत घेऊन पाहणी केली असता त्याच्या गळ्यावर जखम झाल्याचे व शरीर थंड पडल्याचे दिसल्याने त्यांनी आरडाओरडा केला तेंव्हा शेजारी राहणाऱ्या गेंदाबाई बाबुराव मुंढे, रुक्मिणबाई राम साळवे आदी महिला धावत आल्या. (Gangakhed Youth Death) मुलगा धूराजी संपत कांबळे हा मयत झाल्याची खात्री झाल्यामुळे त्यास दवाखान्यात नेले नाही.
मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कोणीतरी डायल ११२ क्रमांकावर फोन करून पोलीसांना घटनेची माहिती दिल्यामुळे (Gangakhed Police) पोलीस शिपाई सुनील मामीलवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत याची माहिती पोलीस ठाण्यात दिल्यावरून पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे, बिट जमादार मारोती माहूरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन मयत धुराजी कांबळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. शवविच्छेदन करून (Gangakhed Youth Death) मृतदेह ताब्यात देण्यात आला. नशेत असलेल्या मुलाचा झोपेत छतावरून पडल्याने मृत्यू झाल्याची खबर सखुबाई कांबळे यांनी दिल्यावरून गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास (Gangakhed Police) सहायक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे हे करीत आहेत.