स्थानिक गुन्हे शाखेची रेल्वे स्थानक परिसरात कारवाई
परभणी (Parbhani Crime) : येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवार ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास परभणी रेल्वे स्थानक परिसरात कारवाई केली. या कारवाईत दोघांजवळून ६ लाख ४ हजार रूपये किंमतीचा ३२ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या (Parbhani Crime) प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
स्थागुशाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कारवाई करण्यात आली. पोलीसांनी शेख अकबर शेख जफर, सुनिल सुंदर हरीजन या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून गांजा जप्त करण्यात आला. संबंधिताची चौकशी केली असता त्यांनी शेख कलीम शेख जहूर याच्याकडून गांजा घेतल्याचे सांगीतले. सदर इसम रेल्वेने मानवतकडे गेल्याची माहिती दिली. (Parbhani Crime) पोलीसांच्या पथकाने पाठलाग करत त्याला पकडले.
ही (Parbhani Crime) कारवाई पोनि. विवेकानंद पाटील, पोनि.पांडूरंग गवते, नायब तहसिलदार विष्णू पकवाने, स्थागुशाचे सपोनि.राजु मुत्तेपोड, पोउपनि.गोपिनाथ वाघमारे, अजित बिरादार, चंदनसिंह परिहार, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, बाळासाहेब तुपसुंदरे, सुग्रिव केंद्रे, कांगणे, निलेश भुजबळ, रवि जाधव, सुलक्षण शिंदे, विलास सातपुते, रंगनाथ दुधाटे, सुर्यकांत फड, राहुल परसोडे, जमीर फारूखी, शेख रफीक, निलेश परसोडे, परसराम गायकवाड, गणेश कौटकर, बालाजी रेड्डी, हानवते, संजय घुगे, इम्रान, सचिन भदर्गे, रंजीत आगळे, शंकर गायकवाड, सिध्देश्वर चाटे, नामदेव डुबे, हनुमान डुबे यांच्या पथकाने केली.