औंढा तालुक्यातील पुरजळ येथील घटना
हिंगोली (Ganpati Visarjan) : औंढा नागनाथ तालुक्यातील पुरजळ येथे श्री मिरवणुकीत (Ganpati Visarjan) नाचण्यावरून मारहाण केल्यानंतर श्री विसर्जनास अटकाव केल्याने औंढा नागनाथ पोलिसात (Aundha Nagnath Police) सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत (Aundha Nagnath Police) पोलिसांनी दिलेली माहिती अशी पुरजळ शिवारात १७ सप्टेंबर रोजी (Ganpati Visarjan) श्री विसर्जन निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत का नाचू देत नाही यावरून वादाची घटना घडली. त्यात गजानन तुळशीराम डुबे व साक्षीदारांना शिवीगाळ करून दगड व लाकडाने मारून दुखापत केल्यानंतर (Ganpati Visarjan) श्री विसर्जनास अटकाव करून जिवाने मारण्याची धमकी दिल्याने १८ सप्टेंबरला औंढा नागनाथ पोलिसात गणेश विठ्ठल कुरे, संदीप विठ्ठल चोपडे, कन्हैया विठ्ठल चोपडे, करण सुभाष राऊत, सागर बाळाजी जाधव, युवराज देवानंद डुबे, कृष्णा दत्ता चोपडे रा.पुरजळ या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास आय.एफ.सिद्दीकी हे करीत आहेत.