डीजेवर भावना दुखविणारे गाणे वाजविल्याचे प्रकरण
हिंगोली (Ganpati Visarjan) : शहरातील रिसालाबाजार भागामध्ये श्री विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणुकीत दोन समाजात तेढ निर्माण होणारे गाणे वाजविल्याने हिंगोली शहर पोलिसात (Hingoli Police) भाजपा पदाधिकार्यांसह 17 गणेश भक्तांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
हिंगोली शहर पोलिसांची कारवाई
हिंगोली शहरातील (Hingoli Police) रिसालाबाजार भागातील सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने 17 सप्टेंबरला श्री विसर्जन मिरवणूक (Ganpati Visarjan) काढली होती. जागीर हुसैन चौकामध्ये ही मिरवणूक आली असता डीजेवर टी राजासिंग अल्बममधील भावना दुखाविणारे गाणे कर्कश आवाजात वाजवून धार्मिक स्थळासमोरून ही मिरवणूक घेऊन गेल्याने हिंगोली शहर पोलिसात सय्यद जमीर सय्यद बशीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कैलास शहाणे, भैय्या ठाकूर, विकास दडंगे, ऋषिकेश शहाणे, शुभम डहारे, किशन शहाणे, अर्जून कहार, अंकित कहार, प्रज्वल लोलगे, योगेश होकर्णे, ऋषिकेश होकर्णे, शुभम डी.डहाळे, अभिषेक टालेकर, प्रतिक लोलगे, रोहित कहार, वैभव लोलगे यांच्यासह डीजे चालक व मालक सर्व रा.हिंगोली यांच्यावर (Hingoli Police) गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गंधकवाड हे करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन (Hingoli Police) जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या भागात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. अनुचित घटना घडू नये यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.