कोरची येथील घटना, शेजारच्या लोकांनी विहीरीच्या मोटारपाईपाने आग आटोक्यात आणली
कोरची (Short circuit) : कोरची येथील फवारा चौकातील नंदू गॅरेज हे शाँटसर्कीट मुळे स्फोट झाल्याची घटना मंगळवार १७ डिसेंबर रोजी रात्रोच्या सुमारास घडली. सुदैवाने दुकान मालक नंदकिशोर धकाते हे दुकान बंद करून आपल्या घरी गेले होते त्यामुळे घटनेत कोणतेही जीवीतहानी झाली नाही. परंतु स्फोटात मोटारसायकल व सर्व साहित्य, तसेच दुकान (Short circuit) जळून खाक झाले आहे.
दुकानाच्या बाजुला. किरायाने राहत असलेले गुरूभेलीया कुटुंबाला काहीतरी जळत असल्याची वास आली त्यामुळे घराच्या बाहेर निघुन बघताच दुकान जळत असल्याचे दीसले . त्यांनी लगेच ही माहिती नंदु गॅरेज मालकाला ध्वनी वरून कळवली व जवळच असलेल्या वीहिरीतील मोटरपाइपने आग आटोक्यात आणली .स्फोटानंतर लागलेल्या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य (Short circuit) जळून खाक झाले आहे. यावेळी त्यांनी अथक प्रयत्न करत (Short circuit) आग आटोक्यात आणली.