पुसद (Garlic price) : लसूण हा मानवी आहारातील महत्वाचा घटक असून या घटकामुळे जेवणाची लज्जत वाढते. परंतु, या (Garlic price) घटकाचे भाव वाढल्याने सर्व सामान्यांच्या जेवणातील लज्जत कमी झाली आहे तर अनेक स्वयंपाक घरातून लसन गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. यंदा लसणाची बाजारात आवक कमी झाल्याने मागील महिन्यात अवघ्या १०० रुपये प्रति किलो दराने विकल्या गेलेला या महिन्यात मात्र २५० से २८० रुपये किलोच्या घरात गेला. त्यामुळे लसूण खरेदी करताना ग्राहक हात आखडता घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
साधारणपणे सर्व सामान्य नागरिक उन्हाळ्यात कांद्याची साठवण करून ठेवतात. त्यामुळे दर वाढले तरी फारसा फरक पडत नाही. परंतु (Garlic price) लसुण मात्र साठवून ठेवता येत नसल्याने त्याची खरेदी वेळेवरच मिळेल त्या भावात करावी लागते.
“लसूण खरेदी करताना गृहिणींनी हात घेतला आखडता उन्हाळ्याच्या दिवसात गृहिणी कांद्याची साठवण करतात. मात्र (Garlic price) लसणाची साठवण उन्हाळ्यात करता येत नाही. ज्या दरात लसूण मिळेल त्या दरात खरेदी करावा लागतो. आगामी काळातही लसणाचे दर वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केल्या जात आहे. त्यामुळे अनेकांच्या स्वयंपाक घरातून लसूण गायब झाल्याचे चित्र दिसत आहे. ”