आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतुन ट्रक सह गॅस सिलेंडर जप्त
आखाडा बाळापूर (Gas cylinder case) : यवतमाळ जिल्ह्यात बोदेगाव येथील इंडियन गैस कंपनीचे गौदाम ४ डिसेंबर रात्री फोडून ५२५ गॅस् सिलेंडर चोरी झाली होती. सदर चोरी प्रकरणात रविवारी रात्री दारव्हा पोलीस व यवतमाळ एलसीबीने आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतुन दोन आरोपी सह ट्रक व सिलेंडर आसा २७ लाख ६४ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर पथकास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.बसवंते, बिटप्रमुख नागोराव बाभळे व डोंगरकडा पोलीस चौकी पथकाने सहकार्य केले.
याबाबत पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहिती नुसार गॅस सिलेंडर गोदाम फोडून चोरीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर दारव्हा, स्थानिक गुन्हे शाखेने तपास करून या गुन्ह्यातील ट्रक चालक मोहसीन कुरैशी अब्दुल वाहेद कुरैशी अर्धापुर नांदेड व दत्ता तुकाराम करपे रा.डिग्रस बु ता. कळमनुरी ताब्यात घेतले. ट्रक व चालकाला डोंगरकडा हद्दीतुन तर गॅस सिलेंडर चोरी करून उतरवले ते दत्ता तुकाराम करपे यांच्या डीग्रस शेतातून १२० रिकामे (Gas cylinder case) सिलेंडर २ लाख ६४ हजार रुपयाचे जप्त केले तर ट्रक सह २७ लाख ६४ हजार रूपयाचा माल सदर पथकाने डोंगरकडा चौकी हद्दीतुन जप्त केला असे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.बी.बसवंते यांनी सांगितले.
पथकात होता यांचा समावेश..
गॅस सिलेंडर प्रकरणात (Gas cylinder case) दोन आरोपींना अटक करून २७लाख६४ हजार मुद्देमाल जप्त कारवाईमध्ये यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि महाले, चव्हाण, मिथुन, सोहेल, अमित व चालक चौधरी तसेच दारव्हा पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे, सारव, युवराज पोलीस पथकाचा समावेश होता.