परभणी (Parbhani) :- सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे राहत्या घरी शॉर्टसर्किट (short circuit) झाल्याने आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरने पेट घेतला असता गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. ही घटना आहेर बोरगाव येथे बूधवार ५ मार्च रोजी सकाळी ५ च्या सूमारास घडली. या आगीत शेतकर्याचे लाखोचे नूकसान झाले असून या आगीमूळे शेतकर्याचा संसारच उघड्यावर पडला आहे.
आगीत शेतकर्याचे लाखोचे नूकसान
तालूक्यातील आहेर बोरगाव येथील हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांच्या राहत्या घरात लाईटचा शॉर्टसर्किट होवून आग लागली. या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीत घरातील गॅस सिलेंडरने(Gas cylinder) पेट घेतला. त्यात सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये घरातील कापूस, रोख रक्कम, सोन्याचे दागिने, ज्वारी, गहू, तूर व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत शेतकर्याचे १२ लाख ६३ हजार २०० रूपयाचे नूकसान झाले आहे.सूदैवाने या स्फोटात कूठलीही जिवीतहानी झाली नाही. घटनेचा पंचनामा महसूलचे तलाठी, ग्रामसेवक व गॅस एजन्शीचे प्रतिनिधी यांनी केला आहे. दरम्यान या घटनेमूळे शेतकरी हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांचा संसार उघड्यावर आला आहे .