मानोरा (Gas cylinder) : चारशे रुपयात मिळणारा गॅसचे भाव दुप्पट म्हणजेच ८३० रुपयाच्या घरात पोहोचल्याने ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांना तो परवडेनासा झाला आहे. (Ujwala Yojana) उज्ज्वला योजनेअंतर्गत १०० रूपयात मिळालेला (Gas cylinder) गॅस महाग झाल्याने झाल्याने महिला पावसाळा अगोदर जंगलात जाऊन वणवण भटकंती करत इंधन डोक्यावर आणून चुली पटविण्याचे नियोजन करतांना दिसत आहे.
इंधन आणण्यासाठी महिला भर उन्हात जंगलात
ग्रामीण भागातील महिलाना चुलीच्या धुर पासून मुक्त करण्यासाठी दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना प्रधानमंत्री (Ujwala Yojana) उज्ज्वला योजनेअंतर्गत शंभर रुपयात गॅस कनेक्शन देवून केंद्र सरकारने मुक्तता केली. त्यावेळी तालुक्यातील हजारो दारिद्रय रेषेखालील महिलांना (Gas cylinder) गॅस मिळाला. परंतू गॅसच्या वारंवार होणाऱ्या भाव वाढीमुळे गरीब कुटुंबाच्या आता आनंदावर विरजण पडले आहे.
भाव वाढवून Gas subsidy घडविली
जसजशी गॅसची (Gas cylinder) दरवाढ होत गेली. तशी मिळणारी (Gas subsidy) सबसिडी कमी होत गेली. ७०० रुपयांना गॅस टाकी मिळत असताना त्यावर ३०० रूपये सबसिडी मिळत होती. आता गॅस चा भाव ८३० रूपये गेल्यावर (Gas subsidy) सबसिडी मात्र फक्त १० रूपये मिळत आहे.