महिलांना आर्वोच्च भाषेत शिवीगाळ धक्काबुक्की झाल्याची घटना
जिंतूर (Jintur Crime) : तालुक्यातील गडदगव्हाण फुलवाडी येथील महिलांनी पुढाकार घेऊन जवळच असलेल्या पंचवटी तांडा या ठिकाणी शनिवार 6 जुलै रोजी सकाळी दहा वाजता दारु विक्रेत्यांच्या घरी धाड मारुन गावठी दारु जप्त (Gavathi Hatbhatti liquor) करुन नष्ट केली गडदगव्हाण फुलवाडी ,तांडा या ठिकाणच्या महिला यामध्ये सहभागी झाल्या होत्या. या गावठी दारू अड्ड्यामुळे आजूबाजूच्या जवळपास तीन ते चार गाव, तांडा, वस्ती मधील महिला गेल्या अनेक महिन्यांपासून त्रस्त होत्या अनेक महिलांचे नवरे ,तरुण मुले या हातभट्टीच्या दारूला बळी पडल्यामुळे दररोज महिलांना घरामध्ये मारहाण वादाचे प्रकार घडत असल्याचेही यावेळी महिलांनी सांगितले ,महिलांना दररोज नाहक त्रास यामुळे सोसावा लागत होता.
दारू विक्रेता व महिलांमध्ये झटापट
तर पोलिसांकडे अनेक वेळा तक्रारी करून देखील कारवाई केली जात नसल्याने, शेवटी परिसरातील अवैद्य दारू विक्रीला वैतागलेल्या महिलांनी हा अड्डा उध्वस्त करण्याचा निर्णय घेतला शनिवारी सकाळी दहा वाजता या महिलांची झुंबड थेट हातभट्टी विक्रेत्याच्या घरी पोहोचली यावेळी हातभट्टी विक्रेता व महिला यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली यामध्ये महिलांनी त्याला दारू विक्री न करण्याची विनवणी केली. परंतु त्याने अर्वाच्च भाषा वापरल्याने शेवटी महिलांनी त्याच्या घरात असलेली जवळपास 100 लिटर हातभट्टी दारू पकडली व नष्ट केली यावेळी पोलिसांना 112 नंबर वर संपर्क साधुन माहिती हि दिली, यामध्ये जवळपास 100 लिटर गावठी हातभट्टीची दारू (Gavathi Hatbhatti liquor) महिलांनी पकडली यावेळी संबंधित अवैध दारू विक्रेताने महिलांना धक्काबुक्की व दमदाटीची भाषा वापरल्याचा प्रकार घडला आहे. अनेक महिन्यापासून काहीजण (Gavathi Hatbhatti liquor) गावठी हातभट्टी दारूचा अड्डा चालवत होते.
महिलांनी दाखवली हिंम्मत
तसेच याच ठिकाणी दारूची विक्री केली जात असल्याने गावातील अनेक लहाण, मोठे जण व्यसनाधीन झाले. यामुळे गावात व घराघरात भांडणे सुरू झाल्याने गावातील महिलांनी चक्क स्वतः पुढाकार घेत या दारुअड्डयावर (Gavathi Hatbhatti liquor) गावठी दारू पकडली व थेट वैतागलेल्या महिलांनी जिंतूर पोलीस ठाणे गाठले यावेळी तात्काळ हा दारू अड्डा बंद करा म्हणुन यासाठी थेट शनिवारी जिंतूर पोलीस स्टेशन गाठून कैफियत मांडली होती.यावेळी जवळपास 50 पेक्षा जास्त महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठून पोलिसांनी संबंधितावर तातडीची कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी महिलांनी केली. संबंधित प्रकरणाची (Jintur Police) पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांनी दखल घेत संबंधित हातभट्टी विक्रेत्याला ताब्यात घेतले. (Jintur Crime) स्थानिक गुन्हे शाखेकडे संबंधित माहिती कळविणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.