घराची झडती; तीन तलवारी व दोन खंजर जप्त
नांदेड (Nanded):- इतवारा पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने पेट्रोलिंग करताना एका आरोपीस 9 मे रोजी मध्यरात्री ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल व जिवंत काडतुस जप्त केले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे स्टाफसह देगलूर नाका परिसरात पेट्रोलिंग (Patrolling) करीत असताना डीबी पथकातील पोलीस नाईक चाऊस यांना शेख इस्माईल शेख संदल हा इस्लामपुरा परिसरात गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव व त्यांच्या पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस आढळून आले असून पोलिसांनी ते जप्त केले. तसेच त्याच्या घराची झडती घेतली असता तीन तलवारी (Swords) व दोन खंजर (daggers) अशी हत्यारे मिळाली आहेत. याप्रकरणी इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.