हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी
हिंगोली (Hingoli Crime Branch) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध गावठी पिस्टल विक्रीचा झडा लावून तिघांना ताब्यात घेतले असून चौघांवर वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Hingoli Crime Branch) करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की (Hingoli Crime Branch) हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी बेकायदेशीरित्या हत्यार बाळगत असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून अधून मधून कारवाई सुरूच आहे. त्याच निमित्त स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गावठी आंतरजिल्हा रॅकेट उघड केले. यापूर्वी पकडण्यात आलेल्या एका आरोपीकडून पिस्टल जप्त केले होते. त्याने हे पिस्टल कोणाकडून घेतले याची सखोल चौकशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली ज्यामध्ये टप्प्याटप्प्याने काही जणांची नावे उघड झाली त्यात पोलिसांनी तपास चक्र फिरवून तीन आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणात (Hingoli Crime Branch) वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरज मधुकर पाटील राहणार नवीन कवठा जिल्हा नांदेड, पवन देवराव पुयड राहणार शिरपूर तालुका पालम जिल्हा परभणी, विशाल बळीराम भोळे राहणार इंदिरानगर पालम जिल्हा परभणी तर फरार असलेला आलम उर्फ अस्लम शेख राहणार पालम या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी दोन गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसंब घेवारे, पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे, पोलीस अमलदार गजानन पोकळे, कुमार मगरे, नितीन गोरे, निरंजन नलावार ,आजम प्यारेवाले ,आकाश टापरे, हरिभाऊ गुंजकर, साईनाथ कंठे, चालक इंगोले यांच्या पथकाने केली आहे.