भंडारा(Bhandara) :- राज्य परिवहण कर्मचार्यांची बँक असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट (State Transport) को. ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गुणवंत सदावर्ते यांच्या वाढदिवसावरून सभासदांनी गोंधळ घातला. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली. मासिकावर झापण्यात आलेल्या महापुरूषांच्या फोटोवरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांमध्ये राडा होवून रोष काढण्यात आला.
गुणवंत सदावर्ते यांच्या वाढदिवसावरून गदारोळ झाल्याची माहिती
एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. गदारोळ होताच काही वेळातच सभा गुंडाळण्यात आली. यावेळी पोलिसांना बोलविण्यात आले होते.
एसटी महामंडळ कर्मचार्यांच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को.ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा भंडार्यात आयोजित करण्यात आली होती. मात्र एसटी कामगार (ST workers) कृती समितीच्या पदाधिकार्यांनी ही सभा अक्षरश: उधळून लावली. वार्षिक विशेषांकावर सत्ताधार्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री रामचंद्र यांच्यासह महात्मा गांधीचा हत्यारा नथुराम गोडसे यांचे लावण्याचा मुद्दा रेटून धरत आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधार्यांना धारेवर धरले. यावेळी वाद वाढला आणि विरोधकांनी अक्षरश: अहवालाची पुस्तके फाडून फेकले. एकमेकांना धक्काबुक्की करत खुच्यांची तोडफोड केली. अखेर आरोप प्रत्यारोपांमुळे गोंधळ वाढतच गेल्याने सभा गुंडाळण्यात आली. सभासदांनी गदारोळ करून रोष काढला. सदर हाणामाणीचा प्रकार पोलिसांपर्यंत पोहचल्याची माहिती पूढे येत आहे.