नांदेड(Nanded) :- हॉर्न वाजवला म्हणून सिनेस्टाईल (Cinestyle) चारचाकी वाहनावर चढून एका तरुणाने डॉक्टर असलेल्या चालकास मारहाण (beating) केल्याचा प्रकार २७ डिसेंबर रोजी सकाळी आयटीआय चौकात घडला.
आयटीआय चौकातील प्रकार
वाहन चालक प्रकाश नागरगोजे हे डॉक्टर असून लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे रुग्णालय आहे. नेहेमीप्रमाणे ते माळाकोळीकडे २७ डिसेंबर रोजी जात असताना ते सकाळी ११.३० वाजता आयटीआय चौकात आले असता हॉर्न (Horn) वाजवला म्हणून सिनेस्टाईल वाहनावर चढून चालक डॉक्टर यांना मारहाण केली. यावेळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती.त्यांनतर मारहाण सुरु असताना डॉ.नागरगोजे यांनी वाहन घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले.