हिंगोली (Hingoli):- वसमत येथे वसमत आसेगाव कॉर्नर जवळील इंडिया बँकेचे(India Bank) जवळ घरकुल लाभार्थी घरकुलाचे आलेले पैसे बँकेतून काढून घेऊन येत असताना चोट्याने त्यावर डल्ला मारला रक्कम असलेली पिशवी कापून 60000 रुपये लांबवण्यात आले असल्याची तक्रार फिर्यादीने वसमत शहर पोलिसांनी दिली आहे यावरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बँके जवळच चोरट्याने पिशवी कापून रक्कम पळवली
वसमत येथील कवठा रोड भागातील रहिवासी सुरेश राघोजी दवणे यांनी वसमत शहर पोलीस ठाण्यात(Police station) तक्रार दिली की 25 जून रोजी त्यांनी वसमत येथील इंडिया बँकेतून 60 हजार रुपये काढले होते. घरकुलाचा तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता. घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी बँक खात्यातून पैसे काढून त्यांनी पिशवीत ठेवले होते. पैसे घेऊन येत असताना बँके जवळच चोरट्याने पिशवी कापून रक्कम लांबवली. या तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्यात 26 जून रोजी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा (crime) नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शेख नय्यर करत आहेत.