पुसद (Gharkul Yojana) : तालुक्यातील बांसी लगत असलेल्या व माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक व यवतमाळ जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कै. देवराव पाटील चोंडी कर यांच्या गावाकडे जाणाऱ्या मार्गावर डोंगर माथ्यावर तत्कालीन खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawli) यांच्या प्रयत्नातून घरकुलांची निर्मिती करण्यात आली होती. मात्र त्या परिसरामधला विकास अजूनही झालेला दिसत नाही.
तत्कालीन खासदार भावना गवळी (MP Bhavana Gawli) या गेल्या पंचवीस वर्षापासून यवतमाळ वाशिम लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. मात्र गत लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारले आणि या ठिकाणी महाविकास आघाडीचे माजी क्रीडा व शिक्षण राज्यमंत्री संजय देशमुख यांचा ऐतिहासिक विजय झाला. मात्र लोकसभेमधला पॅटर्न झालेल्या विधानसभेमध्ये दिसला नाही. महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीचा धडा घेऊन. राज्यातील मतदारांसाठी विशेष करून मुख्यमंत्री माझी लाडली बहीण, (Gharkul Yojana) बेरोजगारांसाठी शिक्षणाानुसार व कंपनीमध्ये काम केल्यानंतर सहा महिन्यासाठी आठ हजार रुपये दहा हजार रुपये पंधरा हजार रुपये असे मानधन घोषित केले होते तर शेतकऱ्यांसाठी शेती सिंचनासाठी लागणारे विज बिल पूर्णतः मोफत केले होते.
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकारणात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ढगफुटी झाल्यासारखे चित्र निर्माण झाले. आणि या ढगफुटीमध्ये राज्यातील मोठे मोठे नेते वाहून गेले. महायुती विशेष करून भारतीय जनता पक्ष 140 सीतांच्या जवळपास अंदाजे, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना 67 सीतांच्या जवळ, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट अंदाजे 57 सीटांच्या जवळपास पोहोचली. यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती वाढली आणि राज्याचा मुख्यमंत्री हा वाद निर्माण झाला. माझी लाडली बहीण योजनेमध्ये निकष विधानसभेची होईपर्यंत राज्यातील बहिणींना या महायुती सरकारने पंधराशे रुपये व दीपावली मध्ये तीन हजार रुपये दिले होते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे हवेत विरणारआता असं चित्र निर्माण झालं आहे.