कन्हान (Shri Mahakali Temple) : नागपुर जिल्हयाची जिवनदायी पावन कन्हान नदीच्या काठावर वसलेले प्रसिध्द ‘क’ तिर्थक्षेत्र असलेले श्री महाकाली मंदिर सत्रापुर रोड कन्हान येथे श्री महाकाली (Shri Mahakali Temple) सेवा समिती कन्हान-सत्रापुर व्दारे चैत्र नवरात्री निमित्य दरवर्षी प्रमाणे चैत्र शु पंचमी बुधवार (दि. २) एप्रिल २०२५ ला सकाळी ९ वाजता सनदजी गुप्ता यांचे हस्ते घट स्थापना करून चैत्र नवरात्री महो त्सवाची सुरूवात करण्यात येणार आहे.
नऊ दिवस पुजा, अर्चना, सकाळ, सायंकाळ आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करून चैत्र नवरात्री महोत्सव थाटात साजरा करण्यात येणार आहे. करिता परिसराच्या जिल्हयातील सर्व भाविक भक्त मंडळींनी निर्धारित वेळेस उपस्थिती राहुन (Shri Mahakali Temple) श्री महाकाली माते च्या दर्शनाचा तसेच धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री महाकाली सेवा समिती कन्हान – सत्रापुर चे सचिव प्रकाश कडु हयानी केले आहे.
