बुलढाणा (Buldhana) :- मेहकर तालुक्यातील मागील वर्षी पिकांचे पुर्णपणे नुकसान झाल्याने बहुतांश शेतकरी (Farmer) वर्ग हा पिककर्जाची परतफेड करु शकला नाही. अशातच महाराष्ट्र बँकेचे घाटबोरी शाखेच्या मॅनेजर यांनी अनेक शेतकर्यांचे सेव्हींग खात्यामध्ये इतर अनुदान किंवा मजुरांचे शासनाच्या रोजगार हमीचे पैसे देण्यापासून अडवणूक करीत आहेत.
अधिकार्यांच्या मुजोर्या अजिबात खपवुन घेणार नाही
त्यात काही महिला व जेष्ठ मंडळींच्या अनेक तक्रारी आल्यात की पीएम किसानचे सुद्धा पैसे देण्यापासून अडवणूक करत असल्याची तक्रार जनता करीत होती सोबतच बँकेमध्ये गेल्यावर अपमान जनक उलडसुलट बोलत आहेत. तसेच २०१९ मधील देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) काळातील कर्जमाफीतील पात्र शेतकरी आजही त्या माफीपासुन वंचित आहे. सदर समस्यांसंदर्भात बँक ऑफ महाराष्ट्र घाटबोरी शाखेमद्ये संभाजी ब्रिगेड जिल्हाकार्याध्यक्ष शेतकरी नेते पांडुरंग पाटील यांच्या नेत्रुत्वात धड़क आंदोलन करन्यात आले. यावेळी खर्या अर्थाने आज शेतकर्यांना आर्थिक विंवचनेतुन बाहेर काढन्यासाठी सरकारने विना अटी-शर्ती संपुर्ण कर्जमाफी करने गरजेचे असताना बँकेच्या अधिकार्यांकडुन शेतकर्यांचे बचत खात्यावरील इतर अनुदान, मनरेगा किंवा तत्सम योजनांचे पैसे देन्यापासुन अडवनुक केली जात आहे. पहीलेच शेतकरी वर्ग अस्मानी संकटांनी त्रस्त आहे अन् बँकेच्या अधिकार्यांनी सुद्धा अशी अडवनुक करने चुकीचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. एकीकडे नुकताच मुख्यमंत्री व दोनही उपमुख्यमंत्री यांचा बुलढाण्यामद्ये कार्यक्रम झाला ज्यामद्ये त्यांनी सरकार शेतकर्यांसाठी काम करत असल्याचा गवगवा केला.
मुजोर अधिकार्यांना संभाजी ब्रिगेड पदाधिकार्यांच्या वतीने चांगलीच तंबी देन्यात आली
परंतु दुसरीकडे शेतकरी वर्गावर बँकांकडुन असा अन्याय होत आहे व आजही काही शेतकरी देवेंद्र फडणवीसांच्या काळातील कर्जमाफीत बसुनही त्यापासुन वंचित आहेत ही दुटप्पी भुमिका आहे असे त्यांनी म्हटले. तसेच मुजोर अधिकार्यांना संभाजी ब्रिगेड पदाधिकार्यांच्या वतीने चांगलीच तंबी देन्यात आली व यानंतर अशाप्रकारच्या तक्रारी आल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईलने परिनाम भोगावे लागतील अशी समज देन्यात आली. तसेच शासन प्रशासनानेही २०१९ कर्जमाफीतील पात्र शेतकर्याला त्वरित न्याय द्यावा अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा देन्यात आला. यावेळी संंभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष धनंजय बुरकुल, कार्यकारिणी सदस्य गजानन पवार, पंजाब पवार, रामप्रसाद पाचपवार, मदन पाचपोर, लक्ष्मिबाई पवार, योगेश पवार, नारायण जाधव, जनार्दन तोंडे, आकाश अजगर, घाटबोरी सरपंच राजकुमार पाखरे, राजेश इंगोले, यांच्यासहीत लोणी गवळी, घाटबोरी, भोसा, टेंबुरखेड इत्यादि गावातील अनेक शेतकरी व महिला उपस्थित होत्या.