परभणी/गंगाखेड (Ghorpad life Save) : श्वानांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या घोरपडीला (यशवंती) गुरुवार रोजी तालुक्यातील खळी येथील शेत मजुरांमुळे जिवदान मिळाले आहे. प्रथमोपचार करून शुक्रवार रोजी सकाळी वनरक्षक यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड तालुक्यातील खळी येथे गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी (Ghorpad life Save) श्वानाच्या हल्ल्यात जखमी झालेली घोरपड (यशवंती) रमेश पवार यांच्या शेतात काम करीत असलेल्या लिंबाजी दसवंते, लिंबाजी धाकपाडे, अमर दसवंते, आरुण घिसडे या शेत मजुरांना दिसून आली त्यांनी तत्परता दाखवत श्वानांना हुसकावून लावत तिचा जीव वाचवत तिला सुरक्षित ठेऊन ओंकार पवार, प्रदिप गौरशेटे यांच्या मार्फत याची माहीती वनरक्षक सुरेखा ई. टोंम्पे यांना दिली. शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी वनरक्षक सुरेखा टोंम्पे यांनी खळी येथे भेट देऊन घोरपडवर (यशवंती) प्रथमोपचार करून तिला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडले.