पांढरकवडा (Yawatmal) :- केळापूर तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका २० वषीय मुलाने सतत अत्याचार केल्याने सदर मुलगी ५ महिण्याची गर्भवती (pregnant) राहिली असुन तिने या अत्याचारा बाबत १८ रोजी रात्री पांढरकवडा पोलीसात तक्रार दाखल केली असून पोलीसांनी आरोपी विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक केली आहे. राहुल गजानन आत्राम २० रा टोकवांजरी ह मु बोरगाव असे आरोपीचे नाव आहे.
तिने आपल्या आईला सोबत आणुन आरोपी विरुध्द तक्रार नोंदविली
अल्पवयीन पीडित व आरोपीचा परिवार एकाच ठिकाणी शेतात सालगडी म्हूणन काम करतात. या गावातील शेतात शेत मालकाच्या घरात ते परिवार आजूबाजूला राहतात. त्या मुळे पीडित व आरोपी यांच्यात ओळख होती. आरोपीने ओळखीचा फायदा घेऊन ती शेतातील घराच्या गच्ची वर भांडे धुवत असताना नराधमाने तिच्यावर सर्वप्रथम अत्याचार केला होता. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने पीडित मुलीवर पुन्हा दोन ते तीन वेळस अत्याचार केला. घाबरलेल्या अल्पवयीन पीडितेने हा प्रकार तिच्या आई वडिलांना सांगितला नाही. नंतर तिचे पोट दुखतं असल्याने ती उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेल्यावर ती गर्भवती असल्याचे समजले सद्या ती १५ वर्षाची असुन ती पाच महिण्याची गर्भवती राहिली आहे. हि बाब तिच्या लक्षात येताच तिने आपल्या आईला सोबत आणुन आरोपी विरुध्द तक्रार (Complaint) नोंदविली.
पोलीसांनी पिडीतेने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणातील आरोपी राहुल गजानन आत्राम वय २० रा.टोक वांजरी यास पोलीसांनी अटक करून तपास सुरू केला आहे.