मानोरा(Washim):- काही वर्षापूर्वी एस टी बस (S.T Bus)प्रवासात सवलत मिळण्यासाठी महिला व पुरुषांना वयाची अट ६० वर्ष होती. त्यावेळी वय कमी असताना देखील कितीतरी महीला पुरुषांनी नवीन आधार कार्ड(Aadhar card), मतदान कार्ड (voting card) काढून वय वाढवून घेतले. याचा बस प्रवासात किती फायदा झाला माहिती नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर राज्य शासनाने जाहीर केलेल्या २१ ते ६५ वर्षे वयोगटातील लाडली बहीण योजनेतून बस पास करिता वय वाढवून घेणाऱ्या हजारो महिला अपात्र ठरणार आहे.
अटी शर्थिमुळे अपेक्षित लाभ निवडणूकीत होणार नाही
सरकार कोणतेही असो निवडणुकीच्या तोंडावर विविध योजनेचे जनतेला प्रलोभने देतात. घोषणांचा पाऊस पाडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. आता विधानसभेच्या निवडणुका दोन तीन महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. या अनुषंगाने सध्या सुरू असलेल्या आर्थिक संकल्पिय अधिवेशनात अक्षरशा घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. शासनाने लाडकी बहीण योजनेची घोषणा करताच विविध शासकीय कार्यालयात महिलांची गर्दी उसळत आहे. सुरुवातीला शासनाने काही अटी व शर्थी लादत विशिष्ट कागदपत्रे (specific documents) व पुराव्याचे नियम घालून दिले होते. दरम्यान अटी शर्थिमुळे अपेक्षित लाभ निवडणूकीत होणार नाही, उलट बहुतांश महिलांचा रोष निर्माण होईल. हे लक्षात येताच दोनच दिवसात यातील बऱ्याच अटी अन् शर्थी शिथिल करण्यात आल्या असल्या तरी काही वर्षापूर्वी ६५ वर्षाच्या महीला, पुरुषांना बसमध्ये अर्धे तिकिटाने प्रवास करण्याची योजना सुरू केली. यावेळी काही महीला अन् त्यांच्या कुटुंबातील लोकांनी अट्टाहास करत बोगस कागदपत्रे काढून ६०, ५५ व ५० वर्ष वय असलेल्या ६५ वर्ष असल्याचे आधारकार्ड काढून अर्धे तिकीट योजनेचा लाभ घेत आहे.
या योजनेतून वय वाढवून घेणाऱ्या महिला वयोमर्यादेतून बाद झाल्या
यात किती महिलांनी अर्ध्या तिकिटावर प्रवास करून योजनेचा लाभ घेतला. हे माहीत नाही, परंतु अश्याप्रकारे वय वाढून घेणाऱ्या लाखो महीला आता उपलब्ध पुरावा असलेले आधार कार्ड, मतदान कार्डनुसार ६५ वर्षाच्या पुढे गेलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना (Laadki Bahin Yojna)२१ ते ६५ वर्षे महीलासाठीच आहे. यामुळे या योजनेतून वय वाढवून घेणाऱ्या महिला वयोमर्यादेतून बाद झाल्या आहेत. प्रत्येक महिलांना मिळणारे १५०० रूपये आता आपल्याला मिळणार नाहीत. या त्यांनी केलेल्या चुकीमुळे त्यांची अवस्था अर्ध्या तिकिटासाठी माहेवारी पगारीला मुकलो अशी म्हणण्याची वेळ महिलावर आलेली आहे.
लाडकी बहीण योजनेची खरी गरज वयोवृध्द महिलेला
लाडकी बहीण योजनेची खरी गरज वयोवृध्द महिलेला आहे. जे तरूण आहेत, ज्यांचे हातपाय चालत आहेत. जे महीला काम करतात, त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापेक्षा जे वंचित, उपेक्षित निराधार आहेत. ज्या महिला भांडे , धूनी धुतात व झाडू मारून आपल्या कुटुंबाची उपजीविका करतात, अश्या महिलांना व वयोवृध्द महिलांना लाडकी बहीण योजनेची खरी गरज आहे. ज्यांना श्रमाची कामे होत नाहीत. वृद्धत्व मुळे हात पाय थकल्याने कुटूंबातील सदस्य त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. यामुळे वृध्दाश्रम हाऊस फुल्ल आहेत. अश्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा, पण सरकारने निवरणुकीच्या तोंडावर हा घेतलेला निर्णय केवळ मताच्या जोगवा मागण्यासाठी घेतल्याचे दिसून येत असल्याची चर्चा वयोवृध्द आजीमधून ऐकावयास मिळत आहे.