हात पिवळे करण्यासाठी आनंदलेल्या माता-पित्यावर आली सरण रचण्याची दुर्दैवी वेळ
हडोळती (Girl Suicide Case) : २० मे रोजी ती विवाह बंधनात अडकणार होती… लग्नघरामुळे घरी नातेवाईक, पाहुणे येत होते… लग्नाची सर्व तयारी झाली होती… लगीन घाई सुरू होती… मात्र नियतीला कांहीतरी वेगळेच मान्य होते. दि. १९ रोजी ती नववधू म्हणून नटणार होती.. अंगाला हळद लागणार होती. परंतु काळाने तिच्यावर घाला घातला… त्या जगण्याचा, भावी संसाराचा डाव अर्ध्यावरती मोडला… ज्या आई-वडिलांचा आनंद तिचे (Girl Suicide Case) हात पिवळे करण्यासाठी ओसंडून वाहत होता त्याच आई-वडिलांवर तिच्यासाठी सरण रचण्याची दुर्दैवी वेळ आली… हे पाहून अख्खा गाव स्तब्ध झाला…
अहमदपुर तालुक्यातील हिप्पळगाव येथील श्रीमंत जाधव व चंद्रकला जाधव हे शेतकरी कुटूंब ३ एकर शेतीवर उपजिविका भागवते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असा परिवार. मोठी मुलगी सुषमा (२१) वर्ष शिक्षणाला आई वडिलांनी मेहनत कबाड कष्ट करून शिकवले मुलगी बी.ए.स्सी. झाली. मुलीचे स्वप्न कांहीतरी मोठया पदावर काम करण्याची होती. (Girl Suicide Case) मुलीला योग्य वर मिळावा म्हणून, कंपनीत काम करणाऱ्या नात्यातीलच आत्याचा मुलगा सुनिल सूर्यवंशी (रा . येलदरा ता. जळकोट) यांच्याशी थाटामाटात लग्न लावून देण्याचे या दापत्यांने ठरवले. गेल्याच आठवड्यात दोघाचा साखर पुडा केला व २० मे लग्नाची तारीख ठरली. परंतु, मंगळवारी दुपारी १ च्या दरम्यान सुषमा पै-पाहुणे येत आहेत, म्हणून घराची साफ सफाई करत होती.
घर स्वच्छ धुवून घेतले. घराची फरशी ओली झाल्यामुळे फरशी कोरडी करण्यासाठी कुलरची पिन लावत असताना सुषमाचा हात लागला त्यामुळे विद्युत प्रवाहाचा शॉक लागला व त्यातच तिचा मृत्यृ झाला. (Girl Suicide Case) गावात मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. क्षणात साऱ्याच्या आनंदाच रूपांतर शोक शकळेत झाले. या दुदैवी घटनेमुळे जाधव व सूर्यवंशी या दोन्ही कुंटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मंगळवारी सांयकाळी ५ वाजता शोकाकूल वातावरणात सुषमा वर अंत्यसंस्कार करण्यात आले. नवजीवनाची सुरुवात होण्याआधी नवरीचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.