परभणी/सेलू (Girl Suicide Case) : तालुक्यातील सोनवटी येथील दोन तरुणांनी पैकी एकाने विनयभंग तर दुसऱ्याने थेट माझ्याशी संबंध ठेव अशी मागणी केल्यामुळे वैतागलेल्या १८ वर्षीय तरुणीने यातून सुटका करून घेण्यासाठी थेट विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी सकाळी११:३० च्या सुमारास सोनवटी शेत शिवारात असलेल्या (Girl Suicide Case) विहीरीत सापडलेल्या मृतदेहानंतर पोलीस तपासात उघडकीस आले आहे.
तालुक्यातील सोनवटी येथील किरण विठ्ठलराव जामकर वय १८वर्षे ४ महिने या तरुणीस मागील दीड वर्षापासून आरोपी राजेश विठ्ठल शेळके हा वाईट हेतूने पाठलाग करत होता तर आरोपी सुंदर राधाकिशन डोईफोडे यांनी किरण जामकर हिचा वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला आणि शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली. नसता राजेश शेळके सोबत तुझे असलेले संबंध तुझ्या वडीलांना सांगेल व लग्न मोडून टाकीन बदनामी करीन अशी धमकी देऊन आत्महत्येस प्रवर्त केले. ही (Girl Suicide Case) घटना २५ फेब्रुवारी रोजी सोनवटी येथील फिर्यादी यांच्या बांधकामावर सायंकाळी ५ वाजता घडली.
दुसरे दिवशी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११:३० वाजता सुरेश खापर खुंटिकर यांच्या शेतात असलेल्या (Girl Suicide Case) विहिरीमध्ये किरण जामकर ही हिने आत्महत्या केली. विठ्ठल आश्रुबा जामकर वय ४१ वर्षे राहणार सोनवटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं ८८/२०२५ कलम १०८,७४,३५१/२,३५१/३,५/३ भारतीय न्याय संहिता अन्वये राजेश विठ्ठल शेळके, सुंदर राधाकिशन डोईफोडे राहणार सोनवटी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी पुढील तपास करत आहेत.
