चिखली (Buldhana):- बांधकाम कामगार विभाग (Department of Construction Labor) अंतर्गत कामगारांना सुरक्षा संच व संसार भांडे वाटप करण्यात आले. अशा लाभार्थ्यांचे बांधकाम कामगार आरोग्य तपासणी मध्ये रक्ताचे नमुने घेण्याचे काम हिंदलॅब च्या माध्यमातून सुरू आहे . परंतु रक्ताचे नमुने(Blood samples) न घेताच हिंगलॅब मधून रक्ताचे नमुने तपासणी गंभीर रिपोर्ट लाभार्थ्यांना वाटप करण्यात आले. त्यामुळे लाभार्थ्यांचे रक्त न देताच तपासणी रिपोर्ट मिळाल्याने गावकऱ्यांनी हा बांधकाम कामगार विभागाचा वैद्यकीय योजनेचा घोटाळा उघडकीस आनला. त्यामुळे मेरा बु गावात मोठी खळबळ उडाली आहे .
बांधकाम कामगार वैद्यकीय योजनेचा घोटाळा गावकऱ्यांनी केला उघडकीस
ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या इमारत बांधकाम कामगारांना शासनाने त्यांच्या सुरक्षासाठी सुरक्षा सचं तसेच दोन वेळेचे जेवण अशी योजना सुरू केली होती. त्यामध्ये मात्र अगोदरचे भोजन योजने मध्ये घोटाळा झाल्याने जेवण वाटप बंद करूण टाकले. तसेच अनेक दलालांनी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळून देतो असे सांगून गोरगरीब कामगार मजुरांकडून दोन ते तीन हजार रुपये घेतले आहे आणि आता या बांधकाम विभागा अंतर्गत कामगारांची नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांची वैद्यकिय आरोग्य तपासणीस(Health Check) योजना सुरू केली. या योजनेचे काम हिंद या महालॅब बुलढाणा यांना दिले. या महालॅबच्या अंतर्गत अनेक तरुण मुले मुली गावा गावात जावून बांधकाम कामगार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना रक्ताचे नमुने घेत आहेत. लाभार्थी सुध्दा या योजनेत आनखी लाभ मिळेल या आशेपोटी रक्त चाचणी करून घेत आहे.
अनेक बांधकाम कामगारांची रक्त तपासणी
याच्याच गैरफायदा घेत हिंद महालॅबच्या तरुणांनी मेरा बु गावातील अनेक बांधकाम कामगारांची रक्त तपासणी केली. परंतु त्यामध्ये ज्या व्यक्तीचे रक्त नमुने घेतलेच नाही अशा लाभार्थ्यांना रक्त चाचणी रिपोर्ट वाटप करण्यात आले. काही रिपोर्ट मध्ये गंभीर आजार असल्याचे नमूद केले आहे हा प्रकार संतोष मापारी यांनी ग्रा. प. सदस्य अमर पडघान यांना सागितले त्यामुळे लगेच ग्रा. प. कार्यालयात रक्त चाचणी करणाऱ्या दोन महिलांना रक्त नमुने घेण्यास थांबवून पत्रकार(journalist), वैद्यकिय अधिकारी डॉ ठाकरे मॅडम, ठाणेदार विकास पाटील, आरोग्य कर्मचारी यांना बोलावून बांधकाम कामगार वैद्यकिय घोटाळा उघडकीस केला . अशा या प्रकारामुळे परीसरात मोठी खळबळ उडाली आहे. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, ग्रा. प. सदस्य अमर पडघान, निखिल पडघान, भरत पडघान, पुरुषोत्तम पडघान, पत्रकार प्रताप मोरे, कैलास आंधळे, सुनिल अंभोरे , तथा मोठया संख्येने गावकरी उपस्थीत होते. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रिंगे साहेब यांनी सांगीतले की या बांधकाम कामगार विभागाच्या वैद्यकिय रक्त नमुने तपासणी बाबतीत आमच्या विभागाचा काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले .
ठाणेदार विकास पाटील, व वैद्यकीय अधिकारी यांनी रक्त नमुने घेणाऱ्या दोन महिलांना विचारले असता त्यांच्याकडे कसलाही पुरावा आढळून आला नाही .तसेच ग्रा.प. सरपंच सचिव यांची परवानगी घेतली नाही आणि उडवा उडवीची उत्तरे देत आमच्याकडुन मोठी चूक झाली असे कबुल करत माफी मागितली .