पुसद (Pusad):- मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी गावालगत असलेल्या भुली या गावाच्या परिसरातील एका विहिरीमध्ये पाण्याच्या शोधार्थ भटकत आलेल्या वन्यजीव बिबट हा त्या विहिरीमध्ये पडला.
सदरील घटना दि.२७ एप्रिल रोजी च्या दुपार दरम्यान घडली. घटनेची वार्ता सर्वत्र पोहोचली. घटनेचे गांभीर्य बघत वनविभागाच्या (Forest Department) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पुसद वनविभागा अंतर्गत कार्यरत असलेली रेस्क्यू टीम (Rescue team) त्यासोबतच नांदेड जिल्ह्यातील रेस्क्यू टीम व वाशिम जिल्ह्यातील रेस्क्यू टीम ला त्या ठिकाणी पाचारण केलं. वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करीत. विहिरीत पडलेल्या त्या बिबटला(Leopard) जाळीमध्ये असलेल्या एका रॅकमध्ये बाहेर काढले. व त्या बिबटला वन विभागाच्या रेस्क्यू टीमने जीवनदान दिले.
सदरील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी वेळेत दाखवलेली तत्परता निश्चितच पाण्याच्या शोधार्थ भटकत असलेल्या व त्या विहिरीमध्ये पडलेल्या बिबटला जीवनदान मिळाले. अन्यथा विहिरीमध्ये तो बिबट गतप्राण झाला असता. हे विशेष सदरील कारवाई वन विभागाचे डीसीएफ यांच्या निर्देशानुसार पुसदच्या रेस्क्यू टीमचे प्रमुख ROF कुणाल लिमकर, RO शेख मुकबिर , वनरक्षक शंकर देव्हढे, आश्विन राठोड , इंगोले यांच्यासह इत्यादी सहभागी झाले होते.