हिंगोली (Hingoli) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संत नामदेव महाराजांच्या जन्मभूमि नर्सी नामदेव येथून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ रथयात्रेचा शुभारंभ २८ एप्रिल रोजी करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात (Government Rest House) घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांच्यासह ज्येष्ठ नेते प्रकाशराव थोरात, माजी जि.प. सदस्य संजय नागरे, राकाँ शहराध्यक्ष केशव दुबे, रवि डोरले यांच्यासह पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
राकॉ जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांची पत्रकार परिषदेत माहिती
यावेळी बी.डी. बांगर यांनी बोलतांना पुढे सांगितले की, नर्सी नामदेव येथून २८ एप्रिल सोमवार रोजी सकाळी १० वाजता गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव २०२५ रथयात्रेस प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने पक्षाचे अनेक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. रथयात्रेचे गुरूव्दारा भगत नामदेवजी येथे आगमन झाल्यावर शिख बांधवांकडून व्हीजेएनटी सेल प्रदेश उपाध्यक्ष बावरीसिंग ठाकुर हे सकाळी ११.४५ वाजता करणार आहेत. घोटा प्रवेशव्दारावर रायुकॉ विधानसभा अध्यक्ष महेश थोरात यांच्यासह केसापूर, घोटा देवी येथील नागरीकांच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. सवड येथे विधानसभेचे नेते प्रकाश थोरात यांच्यासह सवड स्थानिक गावकरी, महिला मंडळातर्फे दुपारी १२. १० वाजता स्वागत केले जाणार आहे. नर्सी फाटा येथे दुपारी १२.३० वाजता हिंगोली राकाँचे तालुकाध्यक्ष रवि डोरले यांच्यातर्फे स्वागत करण्यात येणार आहे. ही रथयात्रा हिंगोली शहरातील नांदेड नाका महाराजा अग्रसेन चौकात दुपारी १२.४५ वाजता आल्यानंतर हिंगोली राकाँ शहराध्यक्ष केशव दुबे यांच्यातर्फे स्वागत केले जाणार आहे.
गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रथयात्रेचा शुभारंभ
हिंगोलीतील महात्मा गांधी चौकात राकाँ उद्योग व्यापार जिल्हाध्यक्ष सुनिल मानका यांच्यासह महिला पदाधिकार्यांच्या वतीने यात्रेचे स्वागत दुपारी १ वाजता केले जाणार आहे. अष्टविनायक चौकात दुपारी १.१० वाजता शहराध्यक्ष केशव दुबे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुपारी १.२० वाजता अभिवादन केले जाणार असुन या ठिकाणी रायुकाँ प्रदेश सचिव सुजय देशमुख यांच्या तर्फे यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. दुपारी १.३५ वाजता परमीवर अब्दुल हमीद चौकात यात्रा आल्यानंतर राकाँ जिल्हा उपाध्यक्ष इंजि. जैन खान यांच्यातर्फे स्वागत केले जाणार आहे. दुपारी १.४० ते ३.१५ दरम्यान यात्रेचा विश्रांतीचा व राखीव वेळ ठेवण्यात आला आहे. त्यानंतर ही यात्रा दुपारी ३.३० वाजता डिग्रस फाट्यावर आल्यानंतर राकाँ विधानसभा अध्यक्ष बबनराव गलांडे यांच्या तर्फे यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. औैंढा नागनाथ येथे यात्रेचे आगमन दुपारी ३.५५ वाजता झाल्यानंतर या ठिकाणी राकाँ ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष विक्की देशमुख, औंढा नागनाथ शहराध्यक्ष शेख आसिफ, अल्पसंख्याक औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष अजहर इनामदार यांच्या हस्ते स्वागत केले जाणार आहे. दुपारी ४.१५ वाजता नागेशवाडी फाट्यावर यात्रा आल्यानंतर औंढा नागनाथ तालुकाध्यक्ष संजय दराडे यांच्या तर्फे यात्रेचे स्वागत केले जाणार आहे.
जवळा बाजार येथे दुपारी ४.३० वाजता यात्रेचे आगमन झाल्यावर रायुकाँ जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर व पदवीधर विभाग जिल्हाध्यक्ष बाबाराव राखुंडे यांच्या तर्फे यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. बाराशिव येथे दुपारी ४.४५ वाजता यात्रेचे आगमन झाल्यावर वसमत विधानसभा अध्यक्ष विनोद अंभोरे, संतोष कदम हे यात्रेचे स्वागत करणार असल्याचा माहिती बी.डी. बांगर यांनी दिली. त्याच प्रमाणे हिंगोली शहरात रथयात्रेचे आगमन झाल्यावर २०१ कलशधारी महिलांच्या हस्ते रथयात्रेचे स्वागत केले जाणार असुन शहरातील प्रमुख मार्गावरून बँड, ढोल ताशाच्या गजरात यात्रा मार्गक्रमण करणार आहे. या यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे.