सईद खान यांचे प्रतिपादन
पाथरी (Gnanaradha bank) : ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बँकेत (Gnanaradha bank) अनेक बँक ठेवीदारांचा जीवनभराच्या मेहनतीचा पैसा मोठ्या प्रमाणात अडकलेला असताना कुटे पती-पत्नी परदेशात पळून जाण्याच्या तयारीत आहेत.परंतु आम्ही हे कदापी होऊ देणार नाही. लोकांच्या कमाईचे पैसे आम्ही मुद्दलासह वसूल करून देऊ, शिवसेनेच्या आणि सदर बँक ठेवीदारांच्या शिष्टमंडळाला सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू, वेळ पडल्यास कुटे कुटुंबीयांची संपत्ती जप्त करायला लावू व त्यातून सर्वसामान्य लोकांचे पैसे परत द्यायला लावू , असे प्रतिपादन शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान (Saeed Khan) यांनी रविवारी ठेवीदारांच्या मेळाव्यात बोलताना व्यक्त केले.
पाथरी तालुका (Pathari taluka) व परभणी जिल्ह्यातील सर्व बँकेमधील ठेवेदारांचा मेळावा रविवार २ जून रोजी शहरातील शिवसेना भवन येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी माजी आमदार माणिकराव आंबेगावकर,चक्रधर उगले,सर्जेराव गिराम,अनिताताई सरोदे, यांच्यासह ठेवीदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी परभणी जिल्ह्यातील शेकडो ठेवीदार मेळाव्याला उपस्थित होते.
पुढे बोलतांना सईद खान (Saeed Khan) म्हणाले की ,जीवनात पैसा कमावण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. लोकांच्या कष्टाचा पैसा सहजासहजी (Gnanaradha multistate) ज्ञानराधा मल्टीस्टेटला लुटू देणार नाही. वेळ पडल्यास शिवसेना स्टाईलने त्यांना धडा शिकवू असा इशारा ही शिवसेना अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी बोलतांना दिला. दरम्यान कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एल.आर.कदम यांनी केले.