Salman Khan Case:- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) गँगच्या नावाने मुंबई वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. यामध्ये सलमान खानने(Salman Khan) मंदिरात जाऊन माफी मागावी आणि ५ कोटी रुपये देण्याची मागणी करण्यात आली आहे.
धमकीमध्ये अभिनेत्याला देण्यात आले होते दोन पर्याय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांना (Mumbai police) लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमानविरोधात धमकीचा मेसेज आला होता. धमकीमध्ये अभिनेत्याला दोन पर्याय देण्यात आले आहेत – जिवंत राहण्यासाठी माफी मागा किंवा 5 कोटी रुपये द्या. एका आठवड्यात सलमानला मिळालेली ही दुसरी धमकी आहे.
व्हॉट्सॲपवर आला धमकीचा मेसेज
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला काल रात्री व्हॉट्सॲपवर(Whatsapp) गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकीचा संदेश आला. ट्रॅफिक कंट्रोल रूमला पाठवलेल्या मेसेजमध्ये तो लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला होता. जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल किंवा 5 कोटी रुपये द्यावे लागतील. जर त्यांनी हे केले नाही तर आम्ही त्यांना मारून टाकू, आमची टोळी अजूनही सक्रिय आहे.
30 ऑक्टोबरलाही अशीच धमकी मिळाली होती
पोलीस संदेशाची चौकशी करत आहेत. याआधी गेल्या आठवड्यात म्हणजे 30 ऑक्टोबरला मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला सलमान खानला अशीच धमकी मिळाली होती. त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्याकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली आणि ती न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवला होता. यानंतर मुंबई पोलिसांनी मुंबईतील वांद्रे परिसरातून एका व्यक्तीला अटक केली.