जगदेव काळमेघ यांचे पाच लाखाचे नुकसान
धामणगाव रेल्वे (Goat farm fire) : तालुक्यातील भिल्ली येथे शेळीच्या गोठ्याला आग लागली. या आगीत ३८ शेळ्या जळून मृत (Goats burnt dead) पावल्या असून १६ शेळ्या गंभीर जखमी झाले आहे. सदर घटना गुरुवारला रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे जगदेव सदाशिवराव काळमेघ या पशुपालकाचे जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. भिल्ली येथील जगदेव सदाशिवराव काळमेघ यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेळी पालनाच्या व्यवसायातून चालतो. त्यांच्याकडे काळ्या, लालसर व पांढऱ्या रंगाच्या एकूण ५४ शेळ्या होत्या.त्यांच्या व्यवस्थेसाठी चराईनंतर गावातच कुळा काठीने तयार गोठ्यात शेळी सुरक्षित ठेवल्या जातात.
दि.२५ जुलै रोजी नेहमी प्रमाणे शेळ्या चारून आणल्यानंतर त्या गोठ्यात ठेवण्यात आल्या. परंतु गुरुवारला रात्रीच्या सुमारास गोठ्यला (Goat barn fire) अचानक आग लागली. या आगीत ५४ पैकी ३८ शेळ्या होरपळून मृत पावल्या असून १६ शेळ्या गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न केला. परंतु गोठा हा कुडाचा असल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. यामुळे जगदेव काळमेघ या पशुपालकाचे जवळपास ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ऐन पावसाळ्यात आग गोठ्यातील वीज प्रवाहामुळे लागली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी (Jagdev Kalmegh) जगदेव काळमेघ यांनी केली आहे.