अतिरिक्त पाणी ठरवून लागले पिकाला धोकादायक
दत्तात्रय भटक
बार्शीटाकळी (Heavy Rain) : अनेक दिवसापासून सततधार पाऊस चालू असल्याने, शेतकऱ्यांच्या शेतातील विविध प्रकारच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असून कपाशी व तुर पिके सुकू लागली आहेत”. देवा बाप्पा”, आता तरी पाऊस बंद कर, अन् ऊन पाड. अशा प्रकारची मागणी तालुक्यातील गावागावातील शेतकऱ्यांची आहे.
तूर पिके जळू लागली…
गेल्या काही दिवसापासून बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक गावातील परिसरात सतत (Heavy Rain) पाऊस चालू आहे. त्यामुळे काही शेतशिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व तूर पिके सुकू लागली आहेत. तर अतिरिक्त पाऊस पडत असल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पन्नात घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा खचला आहे.
सोयाबीनउत्पादनात घटनेची शक्यता
शेत जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी (Heavy Rain) असल्याने अतिरिक्त पाणी पिकाला सहन होऊ शकत नसल्याने तूर, कपाशी यासारख्या पिकाला पावसाचा जबर फटका बसत असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशी व तूर पिके सुकू लागली आहेत. सद्यस्थितीला पाऊस बंद होणे व पिकाला उष्णतेची गरज आहे. पाऊसही बंद होत नाही आणि ऊनही पडत नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विविध पिकाप्रमाणेच सोयाबीन पिकाला जबर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देवा बाप्पा आता तरी पाऊस पाडणे बंद कर व ऊन पाड अशा प्रकारची विनवणी हतबल झालेला शेतकरी करीत असल्याच्या चर्चा तालुक्यातील अनेक गावात होत आहेत..
