नांदेड(Nanded):- मुदखेड तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या येळी तालुका लोहा व महाटी तालुका मुदखेड या गोदावरी नदीच्या पुलावरून क्रुझर जीप (Cruiser Jeep) नदीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांना जलसमाधी मिळाल्याची घटना 10 मे रोजी दुपारनंतर चार वाजताच्या सुमारास घडली.
चालकाचा ताबा सुटल्यामुळे जीप गोदावरी नदीच्या पात्रात
वाडी नियम तुलापुर शिखाची वाडी येथून बोळवण घेऊन चिलपिपरी या गावी पाहुणेमंडळी गेली होती. दरम्यान परत जात असताना येळी महाटी गोदावरी नदीच्या पुलावर सदर क्रुझर जिप चालकाचा ताबा सुटल्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात कोसळली. या दुर्दैवी घटनेत थोराजी उर्फ बबलू मारुती ढगे वय 25 व उद्धव आनंदराव खानसोळे वय 30 राहणार वाडी नियम तुलापुर शिखाची वाडी हे दोन्ही तरुण जागीच ठार(killed) झाले. घटनेची माहिती प्राप्त होतात घटनास्थळी पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त तरुणांना मदत करण्यासाठी महाटीचे सरपंच प्रतिनिधी बळी पाटील ढगे माळकोट येथील युवक कार्यकर्ते बालाजी पाटील जाधव व वाडी नियम तुलापुर येथील सरपंच यांच्यासह अन्य कार्यकर्ते देखील घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या दुर्दैवी घटनेत प्रकरणी पोलीस दप्तरी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.