गोदा काठावरील गावातील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
परभणी/गंगाखेड (Godavari River) : साखर कारखान्यातील मळीचे घाण पाणी खळी पाटी पुलाजवळील (Godavari River) गोदावरी नदीच्या पात्रात टाकण्यात आल्याने नदी पात्रातील पाण्याचा वापर करणाऱ्या गोदा काठावरील गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माहितीनुसार, गंगाखेड ते परभणी महामार्गावर खळी पाटी जवळील गोदावरी नदी पुलावर परभणीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुने साखर कारखान्यातील मळीचे घाण पाणी (dirty water) टाकण्यात आल्याने हे पाणी थेट गोदावरी नदी पात्रात गेल्यामुळे नदी पात्रातील पाण्याचा रंग काळसर झाला आहे.
गोदावरी नदी (Godavari River) पात्रात साखर कारखान्यातील पाणी टाकल्याने दुर्गंधीयुक्त या मळीच्या घाण पाण्यामुळे (Godavari River) गोदावरी नदी पाण्यातील लहान मोठे मासे मरून पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गोदा काठावरील गावात नळाद्वारे पिण्यासाठी नदीतील पाणी जात असल्यामुळे व नदी पात्रातील पाण्यात मळीचे घाण पाणी मिसळल्याने मळीमिश्रित हे घाण पाणी पिल्याने गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन ग्रामस्थांच्या शरीरास इजा पोहचण्याची शक्यता ग्रामस्थांतून वर्तविली जात आहे. परभणी रस्त्यावर गोदावरी नदी पुलाजवळ टाकण्यात आलेल्या मळीच्या घाण पाण्याचा उर्गवासाचा त्रास रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहन धारकांना त्रासदायक ठरत आहे.
परभणी रस्त्यावरील गोदावरी नदी (Godavari River) पात्रात टाकण्यात आलेल्या घाण मळीचा उग्र वास खळी फाट्यापर्यंत येत आहे. गोदावरी नदी पात्रात येवुन मिसळलेली साखर कारखान्यातील ऊसाची घाण मळी येथे कोण आणुन टाकली याची सखोल चौकशी करून गोदावरी नदी पात्रातील पाण्यात मिसळलेल्या मळी मिश्रित पाण्याचा पंचनामा करून परिसरात दुषित मळीचे पाणी टाकणाऱ्या विरुद्ध पर्यावरण व मानवी आरोग्य धोक्यात आणल्याच्या कलमान्वये कठोर कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.