हिंगोली(Hingoli):- औंढा नागनाथ येथील वनविभागाच्या उंच डोंगरावर गोकर्णेश्वर माळरान परिसरात असलेल्या गोकर्णेश्वर महादेवाचे दिनांक 17 जुलै बुधवार रोजी आषाढी एकादशीनिमित्त दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दाखल झाल्याने गोकर्णेश्वर माळरान परिसरात भाविकांचा मोठा जनसागर उसळला होता.
आषाढी एकादशी निमित्त गोकर्णेश्वर माळरान परिसरात मोठा जनसागर
येथील महादेवाचे दर्शन घेतल्यास साक्षात पंढरपूरच्या(Pandharpur) विठ्ठलाचे दर्शन होते अशी भाविकाची श्रद्धा असल्याने सकाळपासूनच भाविकांनी डोंगर घाटाचा रस्ता चढून गोकर्णेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी रांग लावली होती. निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर असल्याने भाविकांनी डबे व फराळाचे साहित्य सोबत आणून वनभोजनाचा आनंद घेतला सदरील ठिकाणी वन विभागाच्या (Forest Department) वन पर्यटन परिसरात असल्याने वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी कूंडलिक होरे, वन परिमंडळ अधिकारी संदीप वाघ, वनपाल माधव जावडे, हनुमान रावण पल्ले , वनरक्षक सुधाकर चोपडे बालाजी जाधव, गजानन श्रीरामे, शरद सातपुते किशोर आयनीले अगद आयनीले खंडागळे , तसेच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार दिलीप नाईक, जमादार संदीप टाक ज्ञानेश्वर गोरे व हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे उपनिरीक्षक गोविंद जाधव, इकबाल शेख ए पी वाय शिर्केवाड, दत्तात्रय कावरखे, सूर्यभान शंकर भार, नवनाथ महेश गरजे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता हर हर महादेव बम बम भोले च्या गजरात दिवसभरात दोन लाखावर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती वनविभाग प्रशासनाकडून देण्यात आली आहे.