Parbhani Crime :- शहरातील शिवराम नगरात घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे लॉकेट, रोकड मिळून ४० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना २२ मे रोजी दुपारी उघडकीस आली. या प्रकरणी २३ मे ला नवा मोंढा पोलीसात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने आत प्रवेश केला
भारत बावले यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे शिवराम नगरात किरायाच्या घरात राहतात. फिर्यादी छत्रपती संभाजी नगर येथे गेले होते. तर त्यांच्या पत्नी आनंदनगर येथे मावशीकडे गेल्या होत्या. घरात कुणी नसल्याची संधी साधत चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातून दहा ग्राम वजनाचे सोन्याचे लॉकेट (Gold locket)व रोख दोन हजार रूपये असा एकूण ४० हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. तपास पोह वाकळे करत आहेत.




